yuva MAharashtra 'प्रजासत्ताक दिनी' बांधकाम कामगारांच्या न्याय हक्कासाठी, जिल्हाधिकारी सांगली यांच्या कार्यालयासमोर लोकशाही मार्गाने आंदोलन....

'प्रजासत्ताक दिनी' बांधकाम कामगारांच्या न्याय हक्कासाठी, जिल्हाधिकारी सांगली यांच्या कार्यालयासमोर लोकशाही मार्गाने आंदोलन....

वंचित बहुजन माथाडी ट्रान्सपोर्ट व जनरल कामगार युनियन यांच्या वतीने, रविवार दि.२६/०१/०२५ रोजी, 'प्रजासत्ताक दिनी' बांधकाम कामगारांच्या न्याय हक्कासाठी, जिल्हाधिकारी सांगली यांच्या कार्यालयासमोर लोकशाही मार्गाने आंदोलन....



सांगली  :  महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ मुंबई या बांधकाम कामगारांच्या हितासाठी हक्काच्या मंडळावर शासकीय सनदी अधिकारी यांची नियुक्ती करावी, सत्ताधारी पक्षाचा मंत्र्याची वर्णी लावल्याने बांधकाम कामगारांच्या हक्काच्या मंडळात राजकीय हस्तक्षेप वाढत चाललेला दिसत आहे. कामगार मंत्री हे या खात्याचे मंत्री असताना त्यांच्याजवळ संपूर्ण महाराष्ट्र राज्याची मोठी जबाबदारी असताना स्वतंत्र असणारे आणि स्वत्वावर चालत असणारे बांधकाम कामगारांच्या हिताचे महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ मुंबई या अध्यक्ष पदावर कब्जा करून गोरगरीब कष्टकरी बांधकाम कामगारांच्या हक्काची भाकरी हिरावून घेण्याचे घोर पाप हे सत्ताधारी पक्षाचे मंत्रीमहोदय करीत आहेत. तत्कालीन कामगार मंत्री यांनी मंडळाच्या सचिवांना हाताशी धरून मोठ्या प्रमाणावर बेहिशेबी जमा असलेला निधी खर्च केला आहे. गेले पाच वर्षे पासून खर्चाचे शासकीय ऑडिट केलेले नाही. याचबरोबर  जवळपास सहा वर्षांपासून मालक प्रतिनिधी आणि कामगार प्रतिनिधी यांची कायदेशीर नियुक्त नसतानाही मनमानी पद्धतीने खाजगी कंपनीच्या फायद्यासाठी विविध ठेका देण्याचे काम केले आहे. उलट बांधकाम कामगारांच्या हितासाठी आजतागायत कोणत्याही धोरणात्मक निर्णय घेतला नाही.  मंत्रीमहोदय यांच्या चेले चपटे तसेच सगेसोयरे यांच्या आर्थिक तडजोडीसाठी व्यवस्थितपणे सुरू असणारी मंडळाची वेबसाईट (पोर्टल) बंद करून, मंडळाच्या कोट्यवधी रुपयांचा खर्च करून तालुका सुविधा केंद्र या नावाने व्हाइट भ्रष्टाचार हा मंडळाच्या सचिवांनी सुरू केला आहे.



 सद्या सुविधा केंद्रावर होत असलेली बांधकाम कामगारांची पिळवणूक थांबवावी तसेच तालुका सुविधा केंद्राच्या नांवाने कोट्यवधी रुपयांचा निधी खर्च केला जातोय तो खर्च सुविधा केंद्र बंद करून थांबवा. तसेच बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाचे बांधकाम कामगारांच्या हक्काचे वेबसाईट (पोर्टल) पूर्वीप्रमाणे खुली करावी....

 अन्यथा, ॲड. प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर यांच्या वंचित बहुजन माथाडी ट्रान्सपोर्ट व जनरल कामगार युनियन महाराष्ट्र राज्य सांगली यांच्या वतीने, बांधकाम कामगारांच्या न्याय हक्कासाठी लोकशाही मार्गाने, मा. सांगली जिल्हाधिकारी यांच्या कार्यालयासमोर, रविवार दि. २६/०१/२०२५ रोजी प्रजासत्ताक दिनी, आंदोलन करण्यात येणार आहे. यावेळी कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास होणाऱ्या नुकसानीला जिल्हा प्रशासन, महाराष्ट्र शासन तसेच मंडळाचे सचिव जबाबदार राहणार आहे असा इशारा निवेदनाद्वारे वंचित बहुजन माथाडी ट्रान्सपोर्ट व जनरल कामगार युनियन पश्चिम महाराष्ट्र महासचिव प्रशांत वाघमारे, जिल्हाध्यक्ष संजय संपत कांबळे, जिल्हा कार्याध्यक्ष जगदिश कांबळे, जिल्हा संपर्कप्रमुख संजय भूपाल कांबळे तसेच सर्व पदाधिकारी कार्यकर्ते सदस्य यांनी दिला आहे.




<> हेही पहा <>
https://youtu.be/gCoC5Y83jSA?si=t7ZXB0t9c-KXB_oP

🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰


🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰

𝗟𝗶𝗻𝗸𝘀

YouTube Channel

🌐 https://youtube.com/@thejanshakatinews5707

News Portal

🌐 www.theJanShaktiNews.in

🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰