वांग आणि औषधी.. काय पण सांगताय... हा लेख वाचा,, लाईक करून सर्वांना शेअर करा...
वांग्या बद्दलची माहिती ऐकल्यावर, 'काय राव ,सांगता वांगे एवढ औषधी असतय होय?' असा एक साधा प्रश्न, गावाकडच्या माणसाने मला विचारला. वांग्याचं भरीत तुम्ही खाल्ले का हो ?आम्ही अजून मधून वांग्याचं भरीत आवडीने खातो,व भरीत करायला तर एकदमच सोप्प .विशेषतः चुलीवर तयार केलेल्या म्हणजेच भाजून तयार केलेले खूपच उत्कृष्ट लागते ,वांगे हे खूपच पौष्टिक आहे. भाजी करताना वांग हे खूप कच्चे नसावे व खूप पिकलेले ही नसावेत, ज्याच्यात परिपक्व असा आहे ,पूर्ण असे विकसित झालेले वापरावे,लहान वांगे हे पित्त व कफ कमी करते. मोठे वांगे पचायला हलके असले तरी थोडे पित्तकर आहे. वांगे खायचे झाल्यास डोरली वांगे ,कोंबडीच्या अंड्याचा सारखे असणारे पांढरे वांगे, काटेरी वांगी व गावरान अशा काही जाती आहेत तेच खावे, असे आमच् आग्रहाचे सांगणे आहे, वांग्याचे एवढे औषधी उपयोग आहेत हे बऱ्याच जणांना माहिती नसते, गावाकडील लहानपणाचे दिवस मला अजूनही आठवतात ,लग्नामध्ये किंवा कार्यामध्ये, पळसाच्या पत्रावळी मध्ये वांग्या चवळीची भाजी, डाळ, भात घरी तयार केलेले एखादा आंबट लोणचे खाल्लंकी समाधानाची ढेकर सुट्त असे.आमच्या लेखाने, वांग्या बद्दल चे काही गैरसमज सोडले जातील व वांग्याची भाजी घरोघरी आवडीने खाल्ली जाईल, एवढी ही गुणी आहे.आपण आपल्या गच्चीवर किंवा कुंडीमध्ये वांग्याची झाड लावू शकता.
१) वांग्याचे भरीत:-
वांग हे चांगलं धुऊन घ्यावे ,चुलीवर किंवा गॅस वर चांगले भाजावे. वरची जळलेली साल काढून टाकावी ,मग त्या मग ज्यामध्ये मिरपूड ,हिंग , सैंधव टाकून चांगले घोटावे व ज्वारीच्या भाकरीबरोबर खावे, भरिता मध्ये तेल कधीही टाकू नये, टाकले तर पचायला खूपच जड होते , अन्नाचे त्यांनी चांगले पचन होते, भूकही छान लागते ,भरतासाठी डोरलं वांग भेटल्यास एकदम उत्तम. माझ्याकडे येणाऱ्या दोन प्रकारच्या रुग्णांना मी भरीत खायला सांगतो , ज्यांना झोप लागत नाही ,त्यांनीही रात्री खावे ,तसेच बऱ्याच जणांची सारखे पोट दुखत असते, पोट फुगले की मग हृदयावर दाब पडतो. मग कसतरी होतय ,अस्वस्थ होतं य.अशी लक्षणे जाणवतात, त्यांना हा भरताचा प्रयोग छान लागू करतो ,मात्र यासाठी डोरलं वांग, जास दश मुळात 'बहती' असे म्हणतात ते भेटल्यास चांगल, "भाव प्रकाश' नावाच्या ग्रंथात याचे खूप छान वर्णन केलेले आहेत, ग्रंथात सर्व गोष्टी सांगितलेले असतात, त्यासाठी ग्रंथाचे सतत वाचन गरजेचे असते,
2) ताप खोकला:-
तापामध्ये, ही भाजी जरूर खावी. काहीजण वांग्याच्या बिया काढूनही भाजी करतात, तापात तोंडी लावण्यासाठी ही भाजी उत्तम आहे. तोंडास चांगली रुची येते ,शरीरातील क फ कमी होऊन, आम कमी होतो तापात ताजी वांगी वाफवून करावेत त्यात चवीसाठी सैंधव व आले टाकावं खूप छान भाजी होते ,घरातील कुणी आजारी असल्यास, जरूर करून बघा. लाल तिखट हे टाकू नये . वाफवून भाजी केल्यास छान लागते. तांदूळ भाजून केलेला मऊ भात व वांग्याची भाजी , ताप खोकल्या मध्ये उत्तम आराम देणारी योजना आहे.
3) मुळव्याध:-
मूळव्याधीच्या लोकांना ,मी पांढरे वांगे खाण्याचा सल्ला देत असतो व काहींना वांगी भाजून ते फडक्यात बांधून त्याने ही जागा शेकायला सांगतो, मात्र ते काळजीपूर्वक करावे.
4) झोप येण्यासाठी:-
झोप येण्यासाठी, वांगे खूपच फायदेशीर ठरते. वांग्यांच्या पानांचा रस दोन चमचे, खडीसाखरेसह घेतल्यास उत्तम झोप लागते .तसेच वांग्याचा वर सांगितल्याप्रमाणे भरीत खायला सांगतो, त्याने छान आराम पडतो.
5) वजनदार व्यक्तींसाठी:-
काही लोकांच् शरीर हे फुगते, त्यांच्यामध्ये मेद खूपच वाढलेला असतो, त्यांनी अजून मधून वांग्याची भाजी जरूर खावी .अशक्त माणसांनीही भाजी खाल्ली, तर थोड्या दिवसात शक्ती आल्या सारखे वाटेल, गाठीवरती वांगे भाजून लावण्याची काही ठिकाणी पद्धत आहे.
अशक्तपणा वरती, वांग्याची भाजी ही खूपच चांगली आहे ,त्यामुळेच त्याचा आहारात समावेश करत जावा. आमच्या गावातील भाजीवाल्यास आम्ही मुद्दामून एकदा विचारले की, "सर्व भाजीत तुमची आवडती भाजी कुठली ?"तर त्याने "मला वांग खूप आवडतं डॉक्टर , आठवड्यातून एक-दोनदा वांग्याची भाजी मी मुद्दाम खातो ,वांगे खाल्ल्यामुळे माझ शरीर हे काटक आहे" असंही त्यांचं म्हणणं होतं ,आणि ते खरंही आहे.
वांगे हे शुक्रधातू वाढवणारे आहे, त्यामुळे ते भोजनात अजून मधून जरूर खावे,वांगे खूपच स्वादिष्ट व पौष्टिक असे आहे, याबद्दलचा हा लेख वाचून ,माता-भगिनी ह्या वांग्याची भाजी नक्कीच करतील, मात्र फायद्याची आहे, म्हणून दररोज वांग्याची भाजी खातोय, हे काही योग्य नव्हे. या लेखाच्या निमित्ताने जाता जाता वांग्या बद्दलची एक आठवण मला लक्षात आली, वृषण वृद्धि वरती एका शेतकरी बंधू स पोटातून काही औषध दिली व वांग्याचे मूळ उगाळून त्याचा लेप त्याठिकाणी लावायला सांगितला, थोड्या दिवसातच त्यास चांगला फरक पडला,आपण सर्व लोकांनी, शेतकरी बंधूंना गावरान वांग्याची मागणी करावी व याने शेतकरी बंधू गावरान वांगी यांची मुद्दाम लागवड करतील, आता बाजारांमध्ये खूप मोठी अशी वांगी भेटतात त्यातील औषधी गुणधर्म व गावरान वांग यांच्या औषधी गुणधर्म यात निश्चितच फरक असतो, मला वाटतंय, वांग्या बद्दलचा लेख आपल्या सर्वांना नक्कीच आवडला असेल.
संकलन-
निसर्ग उपचार तज्ञ
डॉ. प्रमोद ढेरे, पिंपरी-चिंचवड, पुणे.
आरोग्यविषयक व्याख्याते व लेखक
🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰
𝗟𝗶𝗻𝗸𝘀
YouTube Channel
🌐 https://youtube.com/@thejanshakatinews5707
News Portal
🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰