शासनाने सोमनाथ सुर्यवंशी, लोकनेते विजयराव वाकोडो,संतोष देशमुख यांच्या कुटुंबीयांना १ कोटी रुपये आणि कुटुंबातील १सदस्याला शासकीय नोकरी देण्यात यावी - महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष डॉ. घनःश्याम भोसले
सोलापूर :- दलित पँथरचे संस्थापक अध्यक्ष पद्मश्री नामदेव ढसाळ यांच्या ११व्या स्मृतीदिनानिमित्त सोलापूर येथे अभिवादन सभा आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांचा सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता.
यावेळी भीमसैनिक सोमनाथ सुर्यवंशी, संतोष देशमुख, लोकनेते विजयराव वाकोडे यांना दोन मिनिटे उभे राहून श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
परभणी येथे संविधानाची विटंबना झाल्यावर कोंबिग ऑपरेशनमध्ये अटक केलेल्या सोमनाथ सुर्यवंशी या आंबेडकरी तरुणाचा पोलिस कोठडीत मृत्यू झाला.दलित पँथरच्या माध्यमातून पॅंथर विजय वाकोडे यांनी संघटनेत कामाला सुरुवात केली होती त्यांचे आंबेडकरी चळवळीशी अतुट नातेतर होतेच तसेच त्यांनी विविध ठिकाणी अन्यायाविरुद्ध लढा देण्याचे काम त्यांनी आजपर्यंत केले होते अनेक आंदोलने त्यानी शांतपणे हाताळली आहेत. परभणी येथे झालेल्या संविधान प्रतिकृती अवमान घटनेनंतर झालेल्या आंदोलनात त्याचा सक्रिय सहभाग होता. भीमसैनिक सोमनाथ सुर्यवंशी यांच्या अंत्यसंस्कारावेळी ते हजर होते. त्यानंतर त्यांना अस्वस्थता जाणवत असल्याने कार्यकर्त्यांनी त्यांना रुग्णालयात दाखल केले त्यांतच त्याची प्राणज्योत मावळली.
सोमनाथ सुर्यवंशी यांच्या हत्येला जबाबदार असणाऱ्यांना तसेच बीडच्या केज तालुक्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येला जबाबदार असणाऱ्यांना फाशीची शिक्षा झालीच पाहिजे तसेच भीमसैनिक सोमनाथ सुर्यवंशी, संतोष देशमुख, लोकनेते विजयराव वाकोडो या कुटुंबांना १ कोटी रुपये मदत तसेच कुटुंबातील एका सदस्याला शासकीय नोकरी देण्यात यावी..
परभणी येथील महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याजवळील सविधान प्रतिकृतीची मोडतोड करणाऱ्या भगवान पवाराची न्यायालयीन चौकशी करून नार्को टेस्ट करून त्याच्या पाठीमागील मास्टरमाइंड कोण याची चौकशी करावी व भगवान पवाराला फाशी फाशीची शिक्षा व ॲट्रॉसिटी चा गुन्हा दाखल करून त्याच्यावरती रासो अंतर्गत गुन्हा दाखल करून त्याचा पाठीमागचा मास्टरमांचा शोध घ्यावा व तसेच परभणी मध्ये ऑपरेशन कोबिंगमध्ये ज्या 50 लोकांवरती गुन्हे दाखल झाली आहेत ते तात्काळ मागे घ्यावेत तसेच परभणी येथील
पोलीस कर्मचारी आरोपी
1) अशोक घोरबांड (पी आय. एलसीबी) 2) मरे (पी आय, नवा मोंढा पोलीस स्टेशन) 3) सरला गाडेकर (पीएसआय नवा मोंढा) 4) तुरणर (पीएसआय नवा मोंढा पोलीस स्टेशन) 5) अनिल कटारे (पोलीस हवालदार, नवा मोंढा पोलीस स्टेशन) यांना निलंबित करण्यात यावे अशी मागणी दलित पँथरचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष डॉक्टर घनश्याम भोसले यांनी शासनाला केली आहे.
समाजातील अन्याय अत्याचाराविरोधात जनजागृतीसाठी दलित पँथरची भूमिका यावरही विचार व्यक्त करण्यात आला एकूणच आजची परिस्थितीत दलित पँथर महत्त्वाची भूमिका बजवायची असून यासाठी देशभरात गावागावांमध्ये दलित पँथरच्या घर तिथे भिमसैनिक आणि गाव तिथे शाखा निर्माण करून घराघरातून नवप्रशिक्षित भिमसैनिक घडवण्यात येणार असे आवाहन दलित पँथरचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष डॉ.घन:शाम भोसले यांनी केले.
याप्रसंगी विविध वक्त्यांनी दलित पँथरच्या गौरवशाली इतिहासावर प्रकाश टाकला बाबासाहेबांच्या पश्चात आंबेडकरी समाजाने शिक्षणाच्या आघाडीवर जरूर उल्लेखनीय प्रगती केली असली तरी आंबेडकरी समाज संघटित झाला नाही; आणि संघर्षाच्या बाबतीत बोलायचे झालेतर नामांतराचा लढा ऐतिहासिक लढा सोडला तर मागील तिन दशकांहून अधिक कालावधीत संघर्षाची धार बोथट झाली; ही वस्तुस्थिती कटू असली तरी मान्यच करावे लागेल.
या पार्श्वभूमीवर डोक्याला कफन बांधून जी काही मोजकी कफल्लक माणसं आंबेडकरी चळवळीच्या रक्षणार्थ आणि ती प्रवाहित ठेवण्यासाठी रात्रंदिवस रस्त्यावर आहेत ते अजूनही आहेत ते म्हणजे दलित पँथरचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष डॉ. घनश्याम भोसले असे परखड मत दलित पँथरचे राष्ट्रीय अध्यक्ष बाळासाहेब पडवळ यांनी केले.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष बाळासाहेब पडवळ राष्ट्रीय अध्यक्ष दलित पॅंथर व तसेच कार्यक्रमाचे उद्घाटक व मार्गदर्शक म्हणून डॉ घनःश्याम भोसले यांनी काम पाहिले यावेळी महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष यांच्या पत्नी डॉक्टर रूपाली घनःश्याम भोसले उपस्थित होत्या तसेच याकार्यक्रमांमध्ये पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष प्रमोद लोखंडे व पश्चिम महाराष्ट्र संघटक विश्वास गजभार व तसेच पश्चिम महाराष्ट्र कोषाध्यक्ष परशुराम शरणागत तसेच महाराष्ट्र महिला आघाडी कविताताई बोंडे व तसेच पुणे शहराध्यक्ष राधिका शरणागत सोलापूर जिल्हा अध्यक्ष दादासाहेब शिंदे शिवसेना नेते महेश साठे, अंकुश आव्हाड पुणे जिल्हा अध्यक्ष तसेच रायगड जिल्हा अध्यक्ष मनोज गायकवाड तसेच पॅंथर अतिष ससाने उपस्थित होते. या अभिवादन सभा संपल्यानंतर लगेच ज्या लोकांनी समाजासाठी नवरात्र काम केले आहे असे हिरे चांदू दादू भोसले स्मृती आरोग्य प्रतिष्ठान तर्फे काही क्षेत्रांमध्ये चांगले काम करणाऱ्या गुणगौरव करून मानचिन्ह व सन्मानपत्र बहाल करण्यात आली. गडचिरोलीवरून आलेल्या डॉक्टर प्रणाली भजगवळी यांना समाजरत्न पुरस्कार व पुण्यावरून आलेल्या राधिका शरणागत यांना समाजभूषण पुरस्कार दिला यावेळी असंख्य पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.
🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰
𝗟𝗶𝗻𝗸𝘀
YouTube Channel
🌐 https://youtube.com/@thejanshakatinews5707
News Portal
🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰