yuva MAharashtra ग्रामपंचायत 'कुंडल' येथे ' हिंदू संस्कृतीचे जपणूक करणारा समारंभ संपन्न...

ग्रामपंचायत 'कुंडल' येथे ' हिंदू संस्कृतीचे जपणूक करणारा समारंभ संपन्न...




कुंडल (ता. पलूस) : ग्रामपंचायत कुंडल कार्यालयातर्फे दिनांक २० जानेवारी रोजी घेण्यात आलेल्या हळदी-कुंकूवाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला. यावेळी गावातील महिलांसाठी ग्रामसभेचे आयोजन सुद्धा करण्यात आले होते. ग्रामपंचायतच्या माध्यमातून गावामध्ये होत असलेल्या विकासाबद्दल महिलांकडून समाधान व्यक्त करण्यात आले. गावामध्ये नव्याने निर्माण झालेल्या काही भागात सोयी सुविधा अपेक्षित प्रमाणावर पोहोचवण्याची मागणी यावेळी उपस्थित महिलांच्या माध्यमातून करण्यात आली. अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणात ही सभा पार पडली.



महिलांच्या 'हळदी-कुंकू' मागील धारणा अशी आहे की, प्रत्येक सुवासिनी ही साक्षात आदिशक्तीचे प्रतीक आहे. त्यांना हळद-कुंकू लावताना आपण त्यांच्या माध्यमातून देवीचे तत्त्व जागृत करतो. यामुळे केवळ आध्यात्मिकच नाही, तर आपल्या घरात सकारात्मक ऊर्जा देखील निर्माण होते.



कुंडल मधील या हळदी-कुंकू व ग्रामसभा सोहळ्यामध्ये सुवासिनींना वाण, उखाणे, गाणी, खेळ आणि गोडधोड पदार्थांचा महिलांकडून आनंद घेण्यात आला. हळदी कुंकू समारंभ हा हिंदू संस्कृतीचे जपणूक करणारा समारंभ आहे. या समारंभाच्या माध्यमातून महिला एकत्र येतात, हळदी कुंकू करतात, वाण लुटतात त्यामुळे त्यांची एकमेकींशी ओळख होते आणि स्नेह वाढतो. माणूसच माणसाच्या मदतीला धावून येतो. या झालेल्या ओळखीतून महिला एकमेकींना अडचणीत मदत करून पुढे जाऊ शकतात. आणि याच भावनेने कुंडल येथे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

सदर कार्यक्रमास सरपंच जयराज होवाळ, उपसरपंच अर्जुन कुंभार, ग्रामपंचायत सदस्य किरण लाड, राहुल लाड, जितेंद्र कारंडे, अक्काताई सोळवंडे, मनीषा लाड, रेखा मदने, हणमंत परळे, शंकर पवार, राहुल पवार, प्रशांत आवटे, सुनंदा लाड, सुगंधा एडके, विजया सावत, रेश्मा टेके, सोनाली थोरबोले, शुभांगी माळी यांच्यासह अनेक महिला उपस्थित होत्या.



🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰


𝗟𝗶𝗻𝗸𝘀

YouTube Channel

🌐 https://youtube.com/@thejanshakatinews5707

News Portal

🌐 www.theJanShaktiNews.in

🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰