yuva MAharashtra जी.डी.सी. अँड ए परीक्षेचे अर्ज करण्यासाठी 25 फेब्रुवारीपर्यंत मुदत

जी.डी.सी. अँड ए परीक्षेचे अर्ज करण्यासाठी 25 फेब्रुवारीपर्यंत मुदत



 

       सांगली, दि. 21 (जि. मा. का.) शासकीय सहकार व लेखा पदविका ( जी.डी.सी. अँड ए ) परीक्षा व सहकारी गृहनिर्माण व्यवस्थापन प्रमाणपत्र (सी. एच. एम. ) परीक्षा दिनांक 23, 24 व 25 मे  2025 रोजी घेण्यात येणार असून त्यासाठी दिनांक 25 फेब्रुवारी 2025 पर्यंत फक्त ऑनलाईन पध्दतीनेच अर्ज करता येईल, अशी माहिती जी.डी.सी.ॲण्ड ए.बोर्डाचे सचिव यांनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे दिली आहे. 
          जी. डी. सी. ॲण्ड ए बोर्डाच्या https://gdca.maharashtra.gov.in या संकेतस्थळावरच स्वत:चा User ID व Password तयार करुन या परीक्षेसाठी दिनांक 9 जानेवारी ते दिनांक 25 फेब्रुवारी 2025 या कालावधीत फक्त ऑनलाईन पध्दतीनेच अर्ज करता येईल. परीक्षेसाठी लागणारी आवश्यक अर्हता, अनुभव, आवश्यक कागदपत्रे, ऑनलाइन अर्जासाठी तपशील, परीक्षा केंद्र, शुल्क, परीक्षेच्या अटी व नियम, सूट अभ्यासक्रम व इतर तपशिलासाठी सविस्तर अधिसूचना https://sahakarayukta.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर `महत्वाचे दुवे` मधील `जी.डी.सी. ॲण्ड ए. मंडळ" येथे उपलब्ध आहेत. 





🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰


𝗟𝗶𝗻𝗸𝘀

YouTube Channel

🌐 https://youtube.com/@thejanshakatinews5707

News Portal

🌐 www.theJanShaktiNews.in

🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰