सांगली, दि. 21 (जि. मा. का.) : ग्रामीण भागातील गोशाळा संचालकांना ऑनलाईन अर्ज भरतांना आलेल्या तांत्रिक अडचणी तसेच काही अपरिहार्य कारणांमुळे देशी गाईंसाठी अनुदान योजना अंतर्गत अर्ज न करू शकलेल्या परंतु प्रत्यक्षात सदर योजनेचा लाभास पात्र असणाऱ्या गोशाळांना अर्ज करण्याकरिता २६ जानेवारी २०२५ पर्यन्त मुदतवाढ देण्यात आली असल्याचे सहआयुक्त पशुसंवर्धन डॉ. मंजूषा पुंडलिक यांनी शासकीय प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविले आहे.
गोसेवा आयोगाकडील नोंदणीकृत गोशाळांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याकरिता सन २०२४-२५ पासून गोशाळेत ठेवण्यात येणाऱ्या देशी गायींच्या पालनपोषणासाठी प्रति दिन प्रति गोवंश पन्नास रूपये अनुदान देण्यात येते. यासाठी जिल्ह्यातील गोसंगोपनाचा किमान ३ वर्ष अनुभव असलेल्या, गोशाळेत किमान ५० गोवंश व संस्थेतील ईयर टॅगिंग (भारत पशुधन प्रणालीवर) असलेले तसेच गोसेवा आयोगाकडील नोंदणीकृत गोशाळा, गोसदन, पांजरपोळ व गोरक्षण संस्थांमधील देशी गाई अनुदानास पात्र आहेत.
या योजनेचे सुधारित नियोजित वेळापत्रक, अटी व शर्ती, अंमलबजावणी, योजनेचा ऑनलाईन अर्ज व त्यासोबत जोडावयाची अनुषंगिक कागदपत्रे इत्यादी बाबतची सविस्तर माहिती https://schemes.
🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰
𝗟𝗶𝗻𝗸𝘀
YouTube Channel
🌐 https://youtube.com/@thejanshakatinews5707
News Portal
🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰