सांगली, दि. 21 (जि. मा. का.) : जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण विभागाकडून सन 2024-25 मधील स्वीय निधीतून मागासवर्गीय, दिव्यांग व्यक्तींना घरकुल योजनेचा लाभ घेण्यासाठी जिल्ह्यातील पात्र लाभार्थींनी संबंधित पंचायत समितीकडे अर्ज करावेत, असे आवाहन जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले आहे. अर्जदाराने पंचायत समिती स्तरावर विहित नमुन्यात अर्ज करणे आवश्यक असून, पंचायत समिती स्तरावरून प्राप्त झालेल्या पात्र अर्जदारांच्या यादीमधून लाभार्थी निवड सोडत (लकी ड्रॉ) पध्दतीने करण्यात येणार आहे.
योजनांची सविस्तर माहिती खालीलप्रमाणे आहे.
१) ग्रामीण भागातील मागासवर्गीय व्यक्तिंना (पुरूष व महिला) (अ.जा.,
अ.ज., वि.जा.भ.ज.. व नवबौध्द) नवीन घरबांधणीसाठी आर्थिक सहाय्य करणे - पात्रतेचे निकष - १) अर्जदार अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, विमुक्त जाती व भटक्या जमाती, नवबौध्द या प्रवर्गातील असावा/असावी. २) अर्जदाराच्या कुटुंबाचे मागील आर्थिक वर्षाचे एकूण उत्पन्न रु.१,००,०००/- च्या आत असावे. ३) अर्जदार महाराष्ट्र राज्यातील सांगली जिल्ह्यातील ग्रामीण भागातील रहिवासी असावा. ४) अर्जदाराने या किंवा शासनाकडील अन्य घरकुल योजनेचा यापूर्वी लाभ घेतलेला नसावा.५) अर्जदाराच्या कुटुंबातील कुणीही व्यक्ती शासकीय व निमशासकीय नोकरीत नसावी. ६) एका कुटुंबातील एकाच व्यक्तीला सदर योजनेचा लाभ घेता येईल. ७) अर्जदाराच्या स्वत: च्या नावे असणाऱ्या जागेचा ८ अ उतारा असेसमेंट लिस्ट नुसार- किमान क्षेत्रफळ २६९ चौ. फूट असावे. ८) गावात अर्जदाराचे किंवा त्याच्या कुटुंबियांच्या नावे कोणतेही पक्के घर नसावे.
२) दिव्यांग घरकुल योजना - ग्रामीण भागातील दिव्यांग व्यक्तींना घरबांधणीसाठी आर्थिक सहाय्य करणे. या योजनेच्या लाभासाठी अर्जदाराचे दिव्यांगत्वाचे प्रमाण किमान 40 टक्के असावे. अन्य निकष उपरोक्त योजनेतील निकष क्रमांक 2 ते 8 समान आहेत.