संघटनेच्या सचिव पदी वैभव यादव, कार्याध्यक्ष पदी शशिकांत रेपाळ यांची बिनविरोध निवड
पलूस दि. २८ : पलूस येथे पत्रकार संघाची बैठक दि. २७ डिंसेबर २०२४ रोजी मावळते अध्यक्ष धनंजय दौंडे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या बैठकीत मराठी पत्रकार संघ पलूस तालुका अध्यक्षपदी पत्रकार महेश चौगुले यांची तर उपाध्यक्षपदी पत्रकार सचिन लडगे आणि पत्रकार सूरज शेख, सचिव पदी पत्रकार वैभव यादव, कार्याध्यक्ष पदी पत्रकार शशिकांत रेपाळ यांची सर्वानुमते बिनविरोध निवड करण्यात आली .
मराठी पत्रकार परिषदेचे कार्याध्यक्ष शिवराज काटकर यांच्या मार्गदर्शनाखाली या निवडी संपन्न झाल्या.
नुतन पदाधिकारी निवडी नंतर मावळते अध्यक्ष धनंजय दौंडे यांच्या हस्ते नुतन पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला.
या बैठकीस जेष्ट पत्रकार अमृत यादव, हरूण मगदुम, कुमार गायकवाड, यशवंत कदम, प्रशांत गायकवाड, किशोर आरबुने, पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीचे जिल्हा अध्यक्ष तुकाराम धायगुडे, डिजिटल मिडीया सांगली जिल्हा उपाअध्यक्ष संदीप नाझरे, डिजिटल मिडीया तालुकाध्यक्ष जमीर सनदी,
सुनील पुदाले, आशुतोष कस्तुरे नितीन पाटील, राकेश तिरमारे संजय कुंभार, संभाजी कदम, श्रीकृष्ण आवटे, श्रीकांत निकम, रोहित सोळवंडे, पंकज गाडे, शशिकांत राजवंत, प्रमोद पाटील, विशाल कदम, तसेच जेष्ट पत्रकार प्रमोद सगरे, हृदयनाथ सावंत, विश्वास वाघमारे, सुरेश धोत्रे यांच्यासह सर्व पत्रकार बंधू मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मराठी पत्रकार संघ पलूस तालुका अध्यक्षपदी महेश चौगुले यांची तर उपाध्यक्षपदी सचिन लडगे आणि सूरज शेख,सचिव पदी वैभव यादव,कार्याध्यक्ष पदी शशिकांत रेपाळ यांची बिनविरोध निवड झाली या बद्दल त्यांचे व सर्व नवनिर्वाचित कार्यकारिणीचे " द जनशक्ती न्यूज माध्यम समूहाच्या वतीने "हार्दिक हार्दिकव पुढील वाटचालीस शुभेच्छा...!
🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰
🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰