yuva MAharashtra रब्बी हंगाम आवर्तन नियोजनासाठी पाण्याची मागणी नोंदवा - कार्यकारी अभियंता रा. य. रेड्डीयार

रब्बी हंगाम आवर्तन नियोजनासाठी पाण्याची मागणी नोंदवा - कार्यकारी अभियंता रा. य. रेड्डीयार



        सांगलीदि. 27, (जि. मा. का.) : टेंभू उपसा सिंचन प्रकल्प व्यस्थापन विभागओगलेवाडी अंतर्गत सन 2024-25 मध्ये रब्बी हंगाम आवर्तन पाणी सोडण्याचे नियोजन प्रस्तावित आहे. टेंभू उपसा सिंचन योजना व कृष्णा कालवा तसेच कृष्णा प्रकल्प (आरफळ कालवा) या प्रकल्पाच्या लाभक्षेत्रातील सर्व पाणीवापर संस्थाविविध पाणीपुरवठा योजनाग्रामपंचायत व प्रादेशिक नळपाणी पुरवठा योजना तसेच सर्व बिगरसिंचन ग्राहक आणि वैयक्तिक लाभधारक यांनी टेंभू प्रकल्प व कृष्णा कालवा आणि कृष्णा प्रकल्प (आरफळ कालवा) प्रकल्पाच्या रब्बी हंगाम सन 2024-25 करिता पाण्याची मागणी लेखी नोंदवावीअसे आवाहन कार्यकारी अभियंता रा. य. रेड्डीयार यांनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे केले आहे.

        लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांनी विहित नमुन्यातील नमुना नं. ७७अ व ७ब चे पाणी मागणी अर्ज सर्व तऱ्हेने पूर्ण करून संबंधित उपविभाग तसेच शाखा कार्यालयात तात्काळ भरून दाखल करावेत. विहित नमुन्यातील पाणी मागणी अर्ज व लेखी पाणी मागणी नोंदविल्यानंतर रब्बी हंगाम आवर्तन पाण्याचे नियोजन करण्यात येईल. नमुना नं ७७अ व ७ब चे पाणी अर्जाप्रमाणे मागणी प्राप्त न झाल्यास कोणतेही म्हणणे ग्राह्य धरले जाणार नाही. क्षेत्रीय स्तरावर पाण्याचे नियोजन करण्यात येऊन पाणीपट्टीची रक्कम लाभक्षेत्रातील ऊस कारखान्यांमार्फत कपात करून घेण्यात येईल याची नोंद घ्यावी. तसेच मागील थकबाकी व चालू रब्बी हंगामामधील मागणीप्रमाणे पाणीपट्टी भरून प्रशासनास सहकार्य करावेअसे प्रसिध्दीपत्रकात म्हटले आहे.


🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰


𝗟𝗶𝗻𝗸𝘀

YouTube Channel

🌐 https://youtube.com/@thejanshakatinews5707

News Portal

🌐 www.theJanShaktiNews.in

🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰