VIDEO
भिलवडी (ता. पलूस) : गरजेच्या नात्यापेक्षा भावनेचं नात महत्वाचं असतं.संस्कार आणि विचार मजबूत करण्याचं काम शाळा करतात.
ज्ञान आणि संस्काराला कलेची साथ मिळाल्यास समाजात किंमत प्राप्त होते
असे प्रतिपादन प्रसिद्ध कथाकथनकार जयवंत आवटे यांनी केले.
सांगली जिल्हा पलूस तालुक्यातील भिलवडी शिक्षण संस्थेच्या खाजगी मराठी प्राथमिक शाळा भिलवडीमध्ये आयोजित वार्षिक स्नेहसंमेलन समारंभ प्रसंगी ते बोलत होते.
अध्यक्षस्थानी भिलवडी शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष डॉ.बाळासाहेब चोपडे होते.
जयवंत आवटे यांच्या अस्सल ग्रामीण
ढंगातील विनोदी कथाकथनास उपस्थित विद्यार्थी व पालकांनी दाद दिली.
मान्यवरांच्या हस्ते रांगोळी,हस्तकला
व औषधी वनस्पती प्रदर्शनाचे उद्घाटन,बालकुंज या हस्तलिखिताचे प्रकाशन करण्यात आले.
विविध स्पर्धा परीक्षेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.जेष्ठ नाट्य कलाकार विश्वनाथ माळी यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून सांस्कृतिक कार्यक्रमास प्रारंभ करण्यातआला.
विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या कार्यक्रमास उपस्थित विद्यार्थी,पालक व रसिकांनी उस्फुर्त असा प्रतिसाद दिला.
प्रास्ताविक व स्वागत मुख्याध्यापक सुकुमार किणीकर यांनी केले.संध्याराणी मोरे यांनी अहवालवाचन केले.शरद जाधव यांनी सूत्रसंचालन केले.आभार संजय पाटील यांनी मानले.
यावेळी विश्वस्त अशोक चौगुले,संचालक महावीर वठारे, प्रा.डी.एस.पाटील,अशोक तावदर,संभाजी सूर्यवंशी,भिलवडी शिक्षण संस्थेचे सचिव मानसिंग हाके,माजी संचालक संजय कदम,प्रा.मनिषा पाटील,प्राचार्य डॉ.दीपक देशपांडे,मुख्याध्यापक संजय मोरे,माजी सरपंच सौ.विद्या पाटील,सौ.उमा कोरे, डॉ.सी.व्ही.कुलकर्णी,प्रशांत कांबळे,रोहित रोकडे,शशिकांत कांबळे,पंकज गाडे,श्रेयस पाटील,धनंजय साळुंखे,प्रगती भोसले,विठ्ठल खुटाण,अर्चना येसुगडे,सारिका कांबळे,प्रियंका आंबोळे,अर्चना मोकाशी,विद्या नाईक,मेघना शेटे आदी उपस्थित होते.
🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰
🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰