सांगली, दि. 24 (माध्यम कक्ष) : विधानसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 साठी नामनिर्देशन पत्रे दाखल करण्याच्या तिसऱ्या दिवशी आज जिल्ह्यातील सर्व 8 मतदारसंघांतील 18 उमेदवारांची एकूण 24 नामनिर्देशन पत्रे दाखल झाली. ही माहिती संबंधित मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी यांनी दिली.
तिसऱ्या दिवशी दाखल नामनिर्देशनपत्रांची व विक्रीची माहिती पुढीलप्रमाणे.
नामनिर्देशन पत्र भरण्याची अंतिम तारीख मंगळवार दि. 29 ऑक्टोबर 2024 असून नामनिर्देशन पत्राची छाननी बुधवार दि. 30 ऑक्टोबर 2024 होणार आहे. उमेदवारी अर्ज मागे घेण्याची तारीख सोमवार दि. 4 नोव्हेंबर 2024 आहे. दि. 20 नोव्हेंबर 2024 रोजी मतदान होणार आहे. तर मतमोजणी शनिवार दि. 23 नोव्हेंबर 2024 रोजी होणार आहे. निवडणूक प्रक्रिया पूर्ण करण्याची अंतिम तारीख सोमवार दि. 25 नोव्हेंबर 2024 आहे.
🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰
🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰




