कुंडल दि. 23 : जेव्हा जेव्हा कारखान्याचे धुराडे पेटते तेव्हा तेव्हा शेतकऱ्याचे घरं जळतं असं म्हणतात. आणि याच शेतकऱ्यांच्या ऊसाला उत्पादीत खर्च, आसमानी संकटं, जमिनीची कमी होत चाललेली उत्पादकता या सर्व संकटावरती मात करत जिवाचं रान करुन उत्पादीत केलेल्या ऊसाला उत्पादीत खर्चावरती आधारित भाव द्यावा या मागणीसाठी.. तसेच द्राक्ष व आले शेतकऱ्यातील शेतकऱ्यांची दशा आणि दिशा शेतमालाला हमीभाव मिळावा यासाठी रणसंग्राम सोशल फाउंडेशन व ॲड. दीपक लाड मित्र परिवाराच्या वतीने शनिवार दि. 26 ऑक्टोबर 2024 रोजी सायंकाळी ०६ :०० वाजता पलूस तालुक्यातील कुंडल येथे जाहीर शेतकरी सभा आयोजित करण्यात आली आहे अशी माहिती रणसंग्राम सोशल फाउंडेशन चे संस्थापकअध्यक्ष ॲड. दीपक लाड यांनी दिली.
या सभेचे प्रमुख मार्गदर्शक बळीराजा शेतकरी संघटनेचे बी.जी. काका पाटील,
डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडिया चे प्रा.सुकुमार कांबळे या सह आदी मान्यवरांच्या उपस्थितीत शेतकऱ्यांच्या शेतीमालाच्या हमीभावासाठी या एल्गार सभेचे आयोजन केले आहे.
शेतकऱ्यांची दशा आणि दिशा जाणून घेण्यासाठी तालुक्यातील सर्व शेतकरी बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या यल्गार सभेचा लाभ घ्यावा, असे आवाहन रणसंग्राम सोशल फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष ॲड. दीपक लाड यांनी केले आहे.
🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰
🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰