BANNER

The Janshakti News

शंकर हरी वावरे यांचे दु:खद निधन




भिलवडी दि. 30 : माळवाडी तालुका पलूस येथील धनगर समाजाचे माजी चेअरमन प्रगतशील शेतकरी  शंकर हरी वावरे (आबा) वय वर्ष 92 यांचे गुरुवार दिनांक 29/08/2024 रोजी दुःखद निधन झाले.
  त्यांच्या पश्चात तीन मुलं सुना नातवंडे असा मोठा परिवार आहे 

पद्मभूषण क्रांतिवीर डॉ नागनाथ अण्णा नायकवडी हुतात्मा सहकारी साखर कारखाना लि‌. वाळवा येथे कार्यरत असणारे मुख्य शेती अधिकारी व उत्तर भाग सोसायटी भिलवडी, संचालक श्री सर्जेराव शंकर वावरे तसेच पशुवैद्यकीय डॉ. संजय शंकर वावरे व वावरे शेळी गोट फार्म राजेंद्र शंकर वावरे यांचे ते वडील होत.  
 आबा बद्दल सांगायचं झालं तर ते एक पशुसेवक होते. कोणत्याही पाळीव जनावरांचे हाड मोडले तर ते त्यांच्या कलेने व्यवस्थित करून मोफत सेवा देत होते, तसेच ते एक उत्कृष्ट डिंबाड्या ढोल, उत्कृष्ट ओवी व कैपट वादक होते. आज देखील जुनी जाणकार मंडळी सांगतात की एखाद्या पाच किलोमीटरवर जरी धनगरी ढोल वालूग चालू असला आणि त्या वालगा मधून जर शिडीचा आवाज येत असेल तर ही शिडी कोणाची चालू आहे तर शंकर वावरे यांची शिडी चालू आहे अस त्यांना नावानिशीत ओळखले जात होते. तसेच त्यांनी अनेक पती-पत्नीचे वादविवाद आपसात मिटवून अनेकांचे संसार मार्गी लावले आहेत त्याचबरोबर गावामध्ये समाजामध्ये किंवा पैयपाहुण्यांमध्ये कोणाचाही वादविवाद असेल तर ते न्यायनिवाडा करण्याचे काम करीत होते.

शनिवार दिनांक 31/08/24 रोजी सकाळी 9.30 वाजता भिलवडी येथील कृष्णा घाटावरती रक्षाविसर्जन ,दहावीचा विधी होणार आहे.व दुपारी 12 वाजता माळवाडी येथील घरी कार्याचा विधी होणार आहे.



➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖