BANNER

The Janshakti News

तंबाखू उद्योगाच्या हस्तक्षेपापासून मुलांचे संरक्षण करा - जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. विक्रमसिंह कदम

तंबाखू विरोधी दिनानिमित्त जनजागृतीसाठी पोस्टर स्पर्धांचे आयोजनसांगली, दि. 30 (जि. मा. का.) : सांगली जिल्ह्यामध्ये राष्ट्रीय असंसर्गजन्य रोग नियंत्रण कार्यक्रमांतर्गत राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रमाची अंमलबजावणी सन 2017-18 पासून सुरु आहे. या कार्यक्रमांतर्गत प्रत्येक वर्षी 31 मे हा दिवस जागतिक तंबाखू विरोधी दिन साजरा करण्यात येतो. तंबाखू विरोधी दिनानिमित्त तंबाखू उद्योगाच्या हस्तक्षेपापासून मुलांचे संरक्षण करण्याचे आवाहन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. विक्रमसिंह कदम व जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. विजयकुमार वाघ यांनी केले आहे.

या वर्षाकरिता "तंबाखू उद्योगाच्या हस्तक्षेपापासून मुलांचे संरक्षण (Protecting children form Tobacco industry interference)" ही थीम घोषित केली आहे. 31 मे तंबाखू विरोधी दिनाचे औचित्य साधून नर्सिंग कॉलेज मधील विद्यार्थ्यांमध्ये पोस्टर स्पर्धांचे आयोजन करुन "तंबाखू उद्योगाच्या हस्तक्षेपापासून मुलांचे संरक्षण" या थीमच्या जनजागृतीचे प्रयत्न करण्यात येत असल्याचे आरोग्य विभागामार्फत कळविण्यात आले आहे.

या कार्यक्रमांतर्गत सांगली जिल्ह्यामध्ये तंबाखू सेवन करणाऱ्या व्यक्तींचे समुपदेशन करण्याकरिता एकूण 9 आरोग्य संस्थांमध्ये तंबाखू मुक्ती समपुदेशन केंद्र कार्यरत असून या समुपदेशन केंद्रामध्ये आरोग्य संस्थेमध्ये येणारे रुग्ण, रुग्णांचे नातेवाईक व इतर तंबाखू सेवन करणाऱ्या व्यक्तींचे समुपदेशन करण्यात येते. सन 2023-2024 मध्ये एकूण 2 हजार 877 इतक्या व्यक्तींचे समुपदेशन करण्यात आले आहे. शालेय स्तरावर विद्यार्थी, पालक, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांच्याकरिता जनजागृतीपर कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते. तसेच शाळा तंबाखू मुक्त करण्याकरिता तंबाखू मुक्त शाळेकरिताचे निकष पूर्ण करुन शाळा तंबाखू मुक्त घोषित करण्यात येते. सांगली जिल्हामधील एकूण 1 हजार 455 इतक्या शाळा जिल्हा तंबाखू नियंत्रण व सलाम मुंबई फौंडेशन यांच्या संयुक्त प्रयत्नाने तंबाखू मुक्त घोषित करण्यात आलेल्या आहेत.

राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रमांतर्गत सिगारेट व अन्य तंबाखू उत्पादन कायदा 2003 च्या प्रभावी अंमलबजावणीसाठी सांगली जिल्ह्यामधील आरोग्य विभाग, पोलिस विभाग तसेच अन्न व औषध प्रशासन यांचे संयुक्त अंमलबजावणी पथक स्थापन करण्यात आले असून या पथकामार्फत पान शॉप, सार्वजनिक ठिकाणी व शालेय परिसरात छापे टाकून कायद्याचे उल्लंघन करणाऱ्या व्यक्तीकडून दंड वसूल करण्यात येतो. सन 2023-2024 मध्ये 7 हजार 225 रूपये इतक्या दंडाची वसुली अंमलबजावणी पथकामार्फत करण्यात आलेली आहे.

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
Youtube Link
👇

https://youtube.com/@thejanshakatinews5707

Portal Link
👇

www.thejanshaktinews.in

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖