BANNER

The Janshakti News

सांगलीत 20 जून रोजी व मुंबई येथे 21 जून रोजी डाक अदालत

सांगलीत 20 जून रोजी डाक अदालत

        सांगली, दि. 30, (जि. मा. का.) : भारतीय डाक विभागाची विभागीय स्तरावरील डाक अदालत दि. 20 जून 2024 रोजी सकाळी 11 वाजता प्रवर अधिक्षक डाकघर सांगली यांच्या कार्यालयात आयोजित केली आहे. तक्रारी स्विकारण्याचा अंतिम दि. 10 जून 2024 आहे, असे प्रवर डाक अधिक्षक सांगली यांनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे कळविले आहे.

            पोस्टाच्या सेवेविषयी किंवा कामकाजाबद्दल ज्या तक्रारींचे निवारण सहा आठवड्यांच्या आत झालेले नसेल व समाधानकारक उत्तर मिळाले नसेल अशा तक्रारींची डाक अदालतमध्ये दखल घेतली जाणार आहे.  संबंधितांनी आपली तक्रार तारीख व ज्या अधिकाऱ्यास मूळ तक्रार पाठविली असेल त्याचे नाव व हुद्दा याचा सपष्ट उल्लेख करून मूळ अर्जाच्या प्रतीसह दि. 10 जून 2024 पर्यंत प्रवर अधिक्षक डाकघर सांगली विभाग सांगली यांच्या पत्त्यावर समक्ष अथवा पोस्टाने पाठवावी, असे प्रसिध्दी पत्रकात म्हटले आहे.

मुंबई येथे 21 जून रोजी डाक अदालत

        सांगली, दि. 30 (जि. मा. का.) : भारतीय डाक विभागाची सर्कल स्तरावरील डाक अदालत दि. 21 जून 2024 रोजी दुपारी 3 वाजता पोस्टमास्तर जनरल महाराष्ट्र सर्कल मुंबई यांच्या कार्यालयात आयोजित करण्यात आली आहे. तक्रारी स्वीकारण्याची अंतिम दिनांक 7 जून आहे, अशी माहिती प्रवर डाक अधीक्षक सांगली यांनी दिली.

            महाराष्ट्र व गोवा राज्याशी संबंधित पोस्टाच्या सेवेविषयी किंवा कामकाजाबद्धल ज्या तक्रारींचे निवारण सहा आठवड्यांच्या आत झालेले नसेल व समाधानकारक उत्तर मिळाले नसेल अशा तक्रारींची या डाक अदालत मध्ये दखल घेतली जाणार आहे. विशेषतः टपाल वस्तु, मनी ऑर्डर, बचत बँक खाते, प्रमाणपत्र इत्यादी बाबतच्या तक्रारी विचारात घेतल्या जाणार आहेत. तक्रारींचा उल्लेख सर्व तपशीलासह केलेला असावा. उदा. तारीख व ज्या अधिकाऱ्यास मूळ तक्रार पाठविली असेल त्याचे नांव व हुद्दा याचा स्पष्ट उल्लेख करून मूळ अर्जाच्या प्रतीसह 7 जून पर्यंत सहाय्यक निदेशक डाक सेवा (ज. शि.) आणि सचिव, डाक अदालत, मुख्य पोस्ट मास्टर जनरल यांचे कार्यालय, मुंबई अनेक्स बिल्डींग, जी.पी.ओ. इमारत, चौथा माळा, मुंबई-400001 यांचे नावे दोन प्रतीसह पाठवावेत, असे प्रवर डाक अधीक्षक सांगली यांनी कळविले आहे.

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
Youtube Link
👇

https://youtube.com/@thejanshakatinews5707

Portal Link
👇

www.thejanshaktinews.in

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖