BANNER

The Janshakti News

मतमोजणी कक्षातील व्यवस्थेची जिल्हाधिकाऱ्यांकडून पहाणी



 

  सांगली, दि. 30 (जि. मा. का.) : 44-सांगली लोकसभा मतदारसंघात 7 मे रोजी झालेल्या मतदानाची मतमोजणी येत्या 4 जून रोजी वेअर हाऊसिंग कॉर्पोरेशन मिरज येथे होणार आहे. मतमोजणी केंद्राच्या ठिकाणी उभारण्यात आलेल्या मतमोजणी कक्षाची जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी आज पहाणी केली.




  यावेळी जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांच्या समवेत उप जिल्हा निवडणूक अधिकारी निता शिंदे, उपजिल्हाधिकारी दादासाहेब कांबळे, उपजिल्हाधिकारी स्नेहल कनिचे, सार्वजनिक बांधकाम व इतर विभागाचे अधिकारी उपस्थित होते.




  मतमोजणीच्या अनुषंगाने या ठिकाणी आवश्यक ती सर्व कामे तात्काळ पूर्ण करावीत असे निर्देश देवून मतमोजणी केंद्राच्या ठिकाणी आवश्यकत्या  त्या सेवा सुविधाची पूर्तता झाली की नाही याची खातरजमाही स्वतः जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी यावेळी केली.
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖