BANNER

The Janshakti News

कम्बाईन डिफेन्स सर्व्हिस परीक्षा पूर्वतयारीसाठी नाशिक येथे प्रशिक्षण वर्ग




 

सांगली दि. 28 (जि.मा.का.) :- भारतीय सैन्य दल नौदल व वायु दलामध्ये अधिकरी पदावर भरती होण्यासाठी पात्र उमेदवारांना कम्बाईन डिफेन्स सर्व्हिस परीक्षेची पूर्वतयारी करून घेण्यासाठी छात्रपूर्व प्रशिक्षण केंद्र, नाशिक येथे  10 जून ते 23 ऑगस्ट 2024 या कालावधीत  प्रशिक्षण वर्गाचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये प्रशिक्षणार्थींना नि:शुल्क प्रशिक्षण निवास व भोजन दिले जाणार आहे. या प्रशिक्षण वर्गासाठी उपस्थित राहणाऱ्या जिल्ह्यातील इच्छुक उमेदवारानी 3 जून रोजी जिल्हा सैनिक कार्यालय सांगली येथे  मुलाखतीसाठी उपस्थित राहावे. मुलाखतीवेळी

Department of Sainik Welfare Pune (DSW) यांच्या वेबसाईटवर सर्च करून त्यामधील सीडीएस-63 कोर्स साठी किंवा (संबंधित जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय प्रिंट दिलेल्या) प्रवेश पत्र व त्यासोबत असलेली परिशिष्टांची प्रिंट घेऊन ती पूर्ण भरून सोबत घेऊन यावे.

प्रशिक्षण वर्गात प्रवेश घेण्यासाठी उमेदवार कोणत्याही शाखेचा पदवीधर असावा. तसेच उमेदवार लोकसंघ आयोग (UPSC) नवी दिल्ली यांच्यामार्फत घेण्यात येणाऱ्या सी.डी.एस. या परीक्षेकरिता ऑनलाईन अर्ज केलेला असावा.

अधिक माहितीसाठी प्रभारी अधिकारी छात्रपूर्व प्रशिक्षण केंद्र, नाशिक रोड,  नाशिक येथे training.pctcnashik@gmail.com, दूरध्वनी क्रमांक ०२५३-२४५१०३२ किंवा ९१५६०७३३०६ या व्हाट्सअप क्रमांक (प्रवेशपत्र मिळविण्यासाठी) संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी, सांगली यांनी केले आहे.

हेही पहा ----


https://youtu.be/KdFoXTSTobI?si=B0-mt7Nne630Lu-r
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖