BANNER

The Janshakti News

निधन वार्ता : डी. पी. आय. चे जिल्हा उपाध्यक्ष संदिप काटे यांना मातृशोक


भिलवडी / माळवाडी दि. २७ : माळवाडी (ता. पलूस, जि. सांगली) येथील गुणवंती आनंदा काटे (वय८९) यांचे सोमवारी (दि.२७) रोजी माळवाडी येथील राहत्या घरी वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या पश्चात ३ मुले,२ मुली, सुना, नातवंडे असा परिवार आहे.

 डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडिया, सांगली जिल्हा उपाध्यक्ष संदीप काटे यांच्या त्या मातोश्री होत.


 त्यांच्यावर सोमवारी (दि.२७) रोजी सकाळी साडेसात वाजता भिलवडी येथे कृष्णा घाटावरती अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांचे पार्थिव दर्शनासाठी काही काळ माळवाडी येथील निवासस्थानी ठेवण्यात आले होते. भिलवडी सह परिसरातील सामाजिक शैक्षणिक व राजकीय क्षेत्रातील अनेक मान्यवर अंत्यदर्शनासाठी उपस्थित होते.

रक्षाविसर्जन विधी बुधवार दिनांक २९ मे २०२४ रोजी सकाळी ९ :३० वा. भिलवडी येथील कृष्णा घाटावर  होणार आहे. तसेच दहावा व कार्यविधी त्याच दिवशी होणार आहे..
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖