BANNER

The Janshakti News

भर उन्हाळ्यात विजेचा लपंडाव ; नागरीक उकाडयाने हैराण..




भर उन्हाळ्यात विजेचा लपंडाव ; नागरीक उकाडयाने हैराण..

किलवडी: वार्ताहर           दि. 04 एपिल 2024

सद्या कडक उन्हाळ्याचा मोसम सुरु असून दिवसभर सुर्य आग ओकतोय अशा परिस्थितीत पलूस तालुक्यातील भिलवडी व परिसरात तापमानही जवळपास ४२ डिग्रीपर्यंत पोहचले आहे. असे असताना दिवसा आणि रात्री देखील अगदी आर्ध्या आर्ध्या तासाला विजेचा लपंडाव सुरू आहे. सातत्याने खंडित होणारा वीजपुरवठ्यामुळे नागरिक हैराण झाले आहेत. पंखे आणि एसी बंद पडत असल्याने लहान मुले व ज्येष्ठ नागरिक उकाड्याने हैराण होत आहेत.

भिलवडी व परिसरात मागील काही
दिवसांपासून विजेचा लपंडाव सुरू असल्याने सर्वसामान्य ग्राहकांना ऐन उन्हाळ्यातील वाढत्या तापमानाला सामोरे जाताना अंगाची लाही लाही होत आहे. भिलवडी व परीसरात गेल्या काही दिवसांपासून अवेळी वीज जाण्याने नागरिकांना मोठ्या समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. उन्हाळा असल्याने सूर्य आग ओकत आहे. पाण्याची पातळी खालावत आहे. तीव्र उष्म्याने अंगाची लाही लाही होत असताना अशातच दिवसा आणि रात्री देखील वीजपुरवठा वारंवार खंडित होत असल्याने नागरिकांना मोठी कसरत करावी लागत आहे. यात मुख्यत्वेकरून सकाळी आणि दुपारी वीज खंडीत होण्याचे प्रमाण वाढले असुन महीलांना सकाळी सकाळी वीज खंडीत होत असल्याने पिण्याचे पाणी, घरातील वीजेवर अवलंबून असणार्या कामांचा खेळखंडोबा देखील होत आहे.

उन्हाळ्याची तीव्रता दिवसेंदिवस वाढू लागल्याने घरातील पंखे, कूलर व एसी यांचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. अशा स्थितीत दिवसा आणि रात्री वारंवार वीजपुरवठा बंद चालू असा प्रकार वारंवार होत असल्यामुळे नागरिकांमधून संताप व्यक्त केला जात आहे.
आठवडाभरापासून तापमानातही वाढ झाल्याने घरात वीजपुरवठा सुरळीत राहणे गरजेचे झाले आहे, यादृष्टीने महावितरण कंपनीने आवश्यक उपाययोजना कराव्यात, अशी भावनाही नागरिकांमधून व्यक्त होत आहे.

♦️♦️♦️♦️♦️♦️♦️♦️♦️♦️♦️♦️♦️♦️♦️♦️♦️
♦️♦️♦️♦️♦️♦️♦️♦️♦️♦️♦️♦️♦️♦️♦️♦️♦️