...शिवाजी विद्यापीठाची संशोधन शिष्यवृत्ती जाहीर
...जिल्हा परिषद शाळा नंबर एक,दोन,तीन ने केला सत्कार
VIDEO
पलूस दि. ८ : पलूस येथील जिल्हा परिषदेच्या शाळा नं. 2 मध्ये प्राथमिक शिक्षण घेऊन पुढे गेलेला पलूसमधला महाविद्यालयीन विद्यार्थी सौरभ पाटील याने चालू वर्षी कला वाणिज्य विज्ञान महाविद्यालय पलूस मधील व्यावसायिक अभ्यासक्रमाकडे बीबीए मध्ये शिक्षण घेत असताना शेतकऱ्यांना उपयुक्त ठरेल असे एक अनोखे फवारणी यंत्र तयार केले आहे. त्या यंत्राला शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर व रिसर्च अँड डेव्हलपमेंट पब्लिकेशन्स फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने घेतलेल्या 'कल्पनांची शर्यत' या स्पर्धेत द्वितीय क्रमांक प्राप्त झाला आहे.
या फवारणी यंत्रासाठी 25 हजार रुपयाची संशोधन शिष्यवृत्ती त्याला मंजूर झाली आहे.
त्याच्या या महाविद्यालयीन स्तरावरील मोठ्या यशाबद्दल सोमवार दि.८ रोजी पलूस येथील जिल्हा परिषद शाळा नं.१, शाळा नं.२,शाळा नं.३ मध्ये सौरभचा शाल श्रीफळ आणि शास्त्रज्ञ डॉ.जयंत नारळीकर पुस्तक भेट देऊन गौरव करण्यात आला.
सदरचा सत्कार केंद्रप्रमुख राम चव्हाण व शाळा नं.२ च्या वरिष्ठ मुख्याध्यापिका बीना माने यांच्या हस्ते करण्यात आला.
यावेळी मारुती शिरतोडे, नितीन चव्हाण ,जगन्नाथ शिंदे, बाळासाहेब खेडकर ,अनिल कणसे ,महेशकुमार चौगुले, प्रकाश शिंदे, शैलजा लाड, सुनीता पवार ,कविता कांबळे ,वनिता कांबळे ,स्मिता लाड, विशाखा ढेरे यांच्या सह सर्व शिक्षक विद्यार्थी उपस्थित होते.
◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆
◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆