BANNER

The Janshakti News

मंगळवेढ्यात साजरा होणार ऐतिहासिक स्वामी समर्थ प्रकटदिन


                                   VIDEO
मंगळवेढा दि. ८ : श्री स्वामी समर्थ भगवान बारा वर्षे वास्तव्य वटवृक्ष देवस्थान शनिवार पेठेतील स्वामी मंदिरमध्ये यावर्षी उत्साहात ऐतिहासिक स्वामी समर्थ प्रकट दिन साजरा करण्याचे स्वामी सेवेकरांनी ठरवले असून त्यासाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. 

  दिनांक १० एप्रिल २०२४ रोजी प्रकट दिन सोहळ्यानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.यामध्ये अखंड श्री स्वामी समर्थ चरित्र सारामृत या पवित्र ग्रंथाचे सामूहिक पारायण सोहळा सकाळी १० ते दुपारी १२ या वेळेत आयोजित केले. प्रसिद्ध लेखक प्रा.आप्पासाहेब पुजारी सर यांचे व्याख्यान आयोजित केले आहे.


 बुधवार दिनांक १०एप्रिल रोजी स्वामी समर्थ प्रकटदिनी पहाटे ६.वा. महाअभिषेक, सकाळी ८.३० वा. महाआरती, सकाळी ९ ते १० - टोमके सर रेडिओ स्टार पंढरपूर परमेश्वरी महिला भजनी मंडळ यांचे संगीत सेवा सकाळी १० ते १२ बाळकृष्ण बळवंतराव महाराज यांचे प्रवचन, दुपारी १२ वा. पुष्पवृष्टी, महाआरती व प्रसाद सायं. ०४ पासून. श्री स्वामी समर्थ भगवान चरण पादुका भव्य-दिव्य शोभा यात्रेचे आयोजन केले आहे. 

यावेळी पंढरपूर येथील श्री वैष्णव वारकरी शिक्षण संस्थेचे बालभजनी मंडळ,जय बिरोबा सुरसनाई वद्य पार्टी, कोळेगाव व धुरंधर ढोल-ताशा पथक, सोलापूर व जय मल्हार लेझीम पथक, खंडोबा नल्ली, मंगळवेढा यांचे सह प्रचंड संख्येने सेवेकरी,भक्त, ग्रामस्थ यांच्या उपस्थितीत भव्य अशी शोभायात्रा मंगळवेढा शहरातून निघणार आहे. 

 गुरुवार दि. ११एप्रिल रोजी पहाटे ६ वा. अभिषेक, सकाळी ८.३० वा. आरती, दुपारी १० ते १२ श्री स्वामी समर्थ भजनी मंडळ यांचा भजनाचा कार्यक्रम दुपारी. १२  वा. महाआरती व महाप्रसाद, सायं, ०७ वा. आरती व प्रसाद याप्रमाणे प्रकट दिन साजरा करण्यात येणार असून सर्वांनी या सोहळ्याचा लाभ घेऊन स्वामी आशीर्वाद प्राप्त करून घ्यावा घेण्याची सुवर्णसंधी प्राप्त झाली आहे.
◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆
◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆