BANNER

The Janshakti News

वंचित बहुजन माथाडी ट्रान्सपोर्ट व जनरल कामगार युनियन सांगली जिल्हा यांनी केला, बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या माध्यमातून नोंदीणीकृत बांधकाम कामगारांना गृहउपयोगी विविध तीस भांडी संचाचे वाटप शुभारंभ ...


=====================================
=====================================

  सांगली : आदरणीय ॲड. प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर यांच्या वंचित बहुजन माथाडी ट्रान्सपोर्ट व जनरल कामगार युनियन महाराष्ट्र राज्य सांगली जिल्हाध्यक्ष संजय कांबळे यांच्या नेतृत्वाखाली नोंदणीकृत हजारो बांधकाम कामगारांना संसार उपयोगी तीस विविध वस्तूचे भांडीसंच दिनांक ०६/०३/२०२४ रोजी  सांगलीतील नोंदणीकृत बांधकाम कामगार दऱ्याप्पा कांबळे यांच्या हस्ते वाटप करून शुभारंभ करण्यात आले.
महाराष्ट्र राज्य शासनाने श्रमिक, कष्टकरी,मोलमजुरी करून आपली उपजीविका करीत असणाऱ्या बांधकाम क्षेत्रातील कामगारांसाठी बांधकाम करातून मिळणाऱ्या उत्पन्नातून खऱ्या कष्टकरी बांधकाम कामगारांना विविध कल्याणकारी योजना राबवित आहे तसेच कामगारांना हक्काच्या उपलब्ध निधीतून विविध सोयी सुविधा देण्यात येत आहेत याचा एक भाग म्हणून नोंदीतकृत बांधकाम कामगारांना गृहउपयोगी तीस वस्तूचा संच वाटप करण्याचा महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ, मुंबई यांनी दि. २७/१०/२०२० रोजीच्या बैठकीत राज्यातील मंडळाच्या १० लाख नोंदीत सक्रिय (जिवीत) बांधकाम कामगारांना गृहउपयोगी तीस वस्तूचा संच वितरण करण्याबाबतचा ठराव पारित करण्यात आला, या ठरावाच्या अनुषंगाने शासन निर्णय दिनांक १८ जानेवारी २०२१ पारित करण्यात आला आहे. या नुसार नोंदीणीकृत सक्रिय असलेल्या बांधकाम कामगारांना महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाने गृहपयोगी वस्तू वितरण करण्याच्या योजनेला शासनाने मंजुरी प्रदान केली आहे. सद्या बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळात शिल्लक कोट्यवधी रुपये निधी मधून बांधकाम कामगारांना सर्व कल्याणकारी योजना दिल्या जातात. परंतु सत्ताधारी राजकीय फायद्यासाठी मंडळाचा मालक असल्यासारखे वापर करताना दिसत आहेत. बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळात राजकीय वरदहस्त वाढलेला आहे . तसेच काही खासगी एजंट हे पैसे घेऊन कामगारांची फसवणूक करीत आहेत. सदरची सर्व योजना पूर्णपणे मोफत असून कोणत्याही प्रकारचा अमिषाला बळी पडून नये तसेच आपली फसवणूक झाल्यास मा. सहाय्यक कामगार आयुक्त सो. उद्योग भवन सांगली यांच्या कडे तक्रार करावी व आपली होणारी फसवणूक टाळावी. तसेच नोंदीणीकृत बांधकाम कामगारांना काही अडचण आल्यास वंचित बहुजन माथाडी ट्रान्सपोर्ट व जनरल कामगार युनियन सांगली जिल्हा कार्यालयात संपर्क साधावा. असे आवाहन जिल्हाध्यक्ष संजय कांबळे यांनी केले आहे.




यावेळी महासचिव अनिल मोरे, जिल्हा संपर्कप्रमुख संजय भूपाल कांबळे, जिल्हा कार्याध्यक्ष जगदिश कांबळे, कोषाध्यक्ष हिरामण भगत, सांगली शहर अध्यक्ष युवराज कांबळे, मिरज अध्यक्ष असलम मुल्ला, बंदेनवाज राजरतन, संदीप कांबळे, संगाप्पा शिंदे, विद्याधर बळखंडे, शिरीन मुजावर, जया भगत, मया धुळे, सुरेखा बळखंडे, राजु शिरगिरी, गणेश कबाडे, महादेव चौगुले, प्रकाश पवार, संजय कुलकर्णी, शब्बीर मुल्ला, सिध्दार्थ ठोके, प्रदिप मचद, यल्लाप्पा बनसोडे, रावसाहेब राजरतन,परसराम बनसोडे, रमेश मोळेकर, विजय आवटी यांच्या बरोबर मोठ्या संख्येने नोंदीत बांधकाम कामगार उपस्थित होते.

हेही पहा -----



◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆
◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆