BANNER

The Janshakti News

सांगली जिल्हा युवक काँग्रेसची महत्वपूर्ण बैठक...


=====================================
=====================================

सांगली वार्ताहर :       दि. ६ मार्च २०२४

सांगली जिल्हा युवक काँग्रेसची लोकसभेच्या दृष्टिकोनातून महत्वपूर्ण बैठक सांगली जिल्हा काँग्रेस कमिटी येथे पार पडली. या बैठकीला युवक काँग्रेसचे प्रदेश महासचिव व सांगली जिल्हा युवक काँग्रेस ग्रामीणचे प्रभारी मा. अनिकेत दादा आरकडे तसेच शहर जिल्हा प्रभारी वाहिद भाई निलगरे, सांगली लोकसभा समन्वयक गणेश उबाळे, प्रदेश सचिव मंगेश चव्हाण ,सांगली जिल्हा युवक काँग्रेसचे ग्रामीण अध्यक्ष डॉ.सुशील गोतपागर,सांगली शहर जिल्हा युवक काँग्रेस अध्यक्ष मनोज सरगर यांचे प्रमुख उपस्थित पार पडली.


यावेळी प्रदेश युवक काँग्रेसचे कार्यक्रम
 युथ जोडो, बूथ जोडो
,रोजगार दो न्याय दो , या कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात आला. तसेच सांगली जिल्हा लोकसभा मतदारसंघात युथ काँग्रेसच्या वतीने मोठ्या प्रमाणामध्ये बूथ तिथे  युवक चा कार्यकर्ता अशा पद्धतीने संघटन करून काँग्रेस पक्ष लोकसभेला जो उमेदवार दिल तो ताकतीने निवडून आणण्यासाठी युवक काँग्रेस जीव तोडून काम करेल आणि जिल्ह्याचे नेते मार्गदर्शक मा. आमदार डॉ. विश्वजीतजी कदम साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली व प्रदेश  युवक काँग्रेसचे अध्यक्ष मा.कुणाल दादा राऊत यांच्या नेतृत्वाखाली सांगली जिल्ह्यातील काँग्रसचे सर्व नेते प्रदेश काँग्रेस उपाध्यक्ष मा. विशाल दादा पाटील,जिल्हा अध्यक्ष आ.विक्रम दादा सावंत, नेत्या मा.जयश्री वहिनी पाटील,शहर जिल्हा अध्यक्ष पृथ्वीराज पाटील,जिल्ह्याचे युवा नेते डॉ.जितेश भैय्या कदम यांचे मार्गदर्शनाखाली सर्व सामान्य जनतेपर्यंत काँग्रेस पक्षाचे विचार व पक्षाचे काम, पोचवण्याचे काम तसेच बीजेपीच्या भ्रष्टाचार, महागाई ,बेरोजगारी या धोरणांचा निषेध करून जनतेमध्ये जनजागृती चे काम युवक काँग्रेसच्या मार्फत करण्यात येईल असा ठराव करण्यात आला. 


सांगली जिल्ह्याची लोकसभेची जागा ही काँग्रेसची पारंपारिक जागा असून या ठिकाणी काँग्रेस पक्षाची ताकद आहे त्यामुळे ही जागा काँग्रेसलाच मिळावी असा ठराव या बैठकीमध्ये करण्यात आला.यावेळी जिल्हा युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष पुजा पाटील,सुजित लकडे,जिल्हा सरचिटणीस निखिल सुतार,पलूस कडेगांव विधानसभा अध्यक्ष प्रमोद जाधव, तासगाव कवठेमंकाळ विधानसभेचे अध्यक्ष विशाल शिंदे, खानापूर आटपाडी विधानसभा युवक चे अध्यक्ष अभिजीत पाटील, काँग्रेसचे युवा नेते सनी धोत्रे,आशिष चौढरी, संभाजी पाटील, हर्षद कांबळे पृथ्वीराज चव्हाण , मंगेश मोटे, अक्षय सावंत यांचे सह सांगली जिल्ह्यातील युवक काँग्रेसचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

हेही पहा -----
◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆
◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆