BANNER

The Janshakti News

जागतिक महिला दिनानिमित्त माता रमाई महिला मंडळाच्या वतीने महिला विशेष प्रबोधन संमेलनाचे आयोजन....


=====================================
=====================================

सातारा वार्ताहर :      दि. ६ मार्च २०२४

माता रमाई महिला मंडळ,माता भिमाई स्वयंसहाय्यता महिला बचत समुह, तक्षशिला सामाजिक सेवा संस्था सातारारोड पाडळी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित 8 मार्च 2024 रोजी जागतिक महिला दिनानिमित्त महिला विशेष प्रबोधन संमेलनाचे आयोजन करण्यात आले असून कार्यक्रमाची वेळ सकाळी 10 देण्यात आली आहे या कार्यक्रमाचे उद्घाटक मा.ऍड धनश्री मोतलिंग मॅडम (कायदेशीर सल्लागार बहुजन मुक्ती पार्टी सातारा) या असणार आहेत. तसेच या कार्यक्रमाची अध्यक्षता मा.इंजि तुषार मोतलिंग सर (प्रदेश सचिव बहुजन मुक्ती पार्टी महाराष्ट्र राज्य) करणार आहेत. 


 कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते मा.अनुराधा चव्हाण मॅडम (माजी सदस्या ग्रामपंचायत सातारारोड पाडळी) मा.सतिश गायकवाड सर (मनुस्मृती अभ्यासक तथा सदस्य बामसेफ सातारा) मा.हेमलता बोकणे मॅडम (जिल्हा संयोजक राष्ट्रीय मुलनिवासी महिला संघ सातारा) मा.ऍड तेजस माने सर (वरिष्ठ स्तर दिवाणी न्यायालय सातारा तथा जिल्हा संयोजक ILPA सातारा) वरील वक्ते वर्तमानातील परिस्थितीत महिलांच्या विविध समस्यांवर मार्गदर्शन करणार आहेत तसेच विशेष उपस्थिती मा.डाॅ.संजय आवडे (माजी सरपंच सातारारोड पाडळी) मा.आशा आवडे (माजी सभापती पंचायत समिती कोरेगाव) मा.संदीप आवडे (तालुका अध्यक्ष बहुजन मुक्ती पार्टी कोरेगाव) मा.सिध्दांत आवडे (शहर अध्यक्ष इंजिनिअरिंग कृती समिती सातारा) असणार आहेत या कार्यक्रमाचे आयोजक मा.नालंदा आवडे (अध्यक्षा माता भिमाई स्वयंसहाय्यता महिला बचत समुह) मा.स्वाती आवडे (अध्यक्षा माता रमाई महिला मंडळ) मा.सारिका आवडे (उपाध्यक्ष माता भिमाई स्वयंसहाय्यता महिला बचत समुह) मा.चित्रा काळे (उपाध्यक्ष माता रमाई महिला मंडळ) मा.काजोल आवडे (उपाध्यक्ष माता रमाई महिला मंडळ तसेच कार्यक्रम संयोजक मा.श्रीकांत आवडे (अध्यक्ष तक्षशिला नवतरुण मंडळ) मा.प्रज्वल आवडे (अध्यक्ष तक्षशिला सामाजिक सेवा संस्था) मा.महेश आवडे (कार्यवाहक तक्षशिला नवतरुण मंडळ) मा.प्रमोद काळे (सह - कार्यवाहक तक्षशिला नवतरुण मंडळ) इ. असणार आहेत तसेच माता रमाई महिला मंडळाच्या अध्यक्षा मा.स्वाती आवडे यांनी बहुजन समाजातील महिलांनी मोठ्या संख्येने कार्यक्रमास उपस्थित राहावे असे आवाहन त्यांनी केले आहे.

हेही पहा -----


◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆
◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆