BANNER

The Janshakti News

भिलवडी शिक्षण संस्थेचा तालुक्यात प्रथम क्रमांक.... संस्थेला मिळणार 3 लाख रुपये बक्षीस


=====================================
=====================================

भिलवडी वार्ताहर :         दि. ६ मार्च २०२४

शिक्षक, पालक, विद्यार्थी व माजी विद्यार्थी यांच्यात शाळेप्रती उत्तरदायित्वाची भावना निर्माण व्हावी यासाठी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेतून " मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा "  हा उपक्रम राज्यात प्रथमच राबविण्यात आला.
पलूस तालुक्यातील भिलवडी शिक्षण संस्थेचे , सेकंडरी स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, भिलवडी विद्यालयाने या अभियानात पलूस तालुक्यात प्रथम क्रमांक पटकावला असून 3 लाखाच्या बक्षिसास शाळा पात्र झालेली आहे.

 या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष मा. श्री.विश्वासजी चितळे , उपाध्यक्ष डॉ. बाळासाहेब चोपडे , सचिव मानसिंग हाके , सर्व संचालक, मुख्याध्यापक एस. एस. मोरे, उपमुख्याध्यापक विजय तेली, पर्यवेक्षक विनोद सावंत यांनी सर्व शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी, विद्यार्थी विद्यार्थिनी, ग्रामस्थ, पालक यांचे संस्थेच्या वतीने अभिनंदन केले.

 या उपक्रमासाठी गटशिक्षणाधिकारी मा.अनिस नायकवडी सर्व विषय तज्ञ शिक्षण विभाग पंचायत समिती पलूस यांचे बहुमोलाचे मार्गदर्शन लाभले.



  " मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा " या स्पर्धेचे सर्व निकष शाळेने पुर्ण केले असून शाळेचे सुशोभीकरण,  रंगरंगोटी, प्रबोधनात्मक विचार, सुविचार बोलक्या भिंती, विद्यार्थ्यांची बचत बँक, परसबाग, अमृतवाटिका नवभारत साक्षरता, मेरी माटी मेरा देश अभियान, पोषण आहार , महावाचन चळवळ, १०० टक्के उपस्थितीसाठी शाळेने राबवलेले उपक्रम, वक्तृत्व, हस्ताक्षर, निबंध, पोस्टर ,चित्रकला यामध्ये आयोजित केलेल्या स्पर्धा, स्वच्छता मॉनिटर, विद्यार्थ्यांनी बनवलेले व्हिडिओ, वृक्षारोपण व वृक्ष संवर्धन, शासकीय क्रीडा स्पर्धेत मिळवलेले यश, प्लॅस्टिक मुक्त शाळा, I S O 9001:2015 मनांकित शाळा ,तंबाखू मुक्त शाळा, तसेच दहावीचा व बारावी उत्कृष्ट टक्केवारीच्या निकालाची परंपरा, नवोदय, स्कॉलरशिप, एन एम एम एस परीक्षेत मिळालेले भरीव यश,विद्यार्थ्यांना केलेले मार्गदर्शन, राबवलेले अभिनव उपक्रम, सुसज्ज ग्रंथालय, विज्ञान प्रयोगशाळा, संगणक प्रयोगशाळा, गणित प्रयोगशाळा, 6 डिजिटल क्लास रूम या सर्व बाबींचा विचार  करण्यात आला.

" मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा " या अभियानात शाळेने तालुक्यात प्रथम क्रमांक पटकावल्याबद्दल शाळेचे सर्वत्र अभिनंदन होत आहे. 

  लवकरच जिल्हा परिषद सांगली येथे पालकमंत्री, खासदार, आमदार सर्व शिक्षण विभागातील वरिष्ठ अधिकारी यांच्या उपस्थितीत दिमाखदार सत्कार सोहळा संपन्न होणार आहे अशी माहिती  शाळेचे मुख्याध्यापक एस. एस. मोरे यांनी दिली आहे. 
◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆
◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆