BANNER

The Janshakti News

डॅशिंग नेते वसंत मोरे यांची मनसेला सोडचिठ्ठी


             www.thejanshaktinews.in

=====================================
=====================================

पुणे : वार्ताहर                       दि. 12 मार्च 2024

पुणे : मनसेचे डॅशिंग नेते वसंत मोरे सोशल मीडियावर चांगलेच सक्रिय असतात. मराठी माणसाच्या हक्काचा विषय असो वा एखाद्याला मदत करणं असो मोरे आपली प्रत्येक अपडेट सोशल मीडियावरून देत असतात. सोशल मीडियावर देखील त्यांचा मोठा चाहता वर्ग असून, त्यांची प्रत्येक पोस्ट नेहमीच ते चर्चेत असते. अशात त्यांची सोशल मीडियावर पोस्ट चांगलीच चर्चेत आली आहे.


“साहेब मला माफ करा…. अशी पोस्ट शेअर करत वसंत मोरे यांनी मनसेला ‘जय महाराष्ट्र’ केला आहे. ‘अखेरचा जय महाराष्ट्र… साहेब मला माफ करा’ असं म्हणत वसंत मोरे यांनी मनसे पक्षाचे सर्वेसर्वा राज ठाकरे यांना नमस्कार करत फेसबुक पोस्ट शेअर केली आहे. यानंतर वसंत मोरे यांनी माध्यमांशी बोलतांना पहिली प्रतिक्रिया दिली आहे.


वसंत मोरे म्हणाले की, “आपण मनसेच्या प्राथमिक सदस्यत्वासह सर्व पदांचा राजीनामा दिला असल्याचं वसंत मोरे यांनी जाहीर केलं. यावेळी वसंत मोरे यांचा संयमाचा बांध फुटला. वसंत मोरे यांच्या डोळ्यांमध्ये अश्रू तरळले. वसंत मोरे माध्यमांसमोर गऱ्हाणे मांडू लागले. पुणे शहरातील पक्षातील नेत्यांच्या वागणुकीमुळे आपण पक्षाला सोडचिठ्ठी देत असल्याचं वसंत मोरे यांनी स्पष्ट केलं.

तिथे राहून उगाच माझ्या चारित्र्यावर आणि वागणुकीवर आरोप होत असतील, तर अशा ठिकाणी न राहिलेलं बरं, अशी भावना त्यांनी व्यक्त केली तर आता कोणत्या पक्षाकडून ऑफर आली आहे का? यावर बोलताना ते म्हणाले, माझी आता कुठलीही भूमिका नाही.

मी सर्व पदाचे राजीनामे दिले आहेत. पक्ष सदस्यत्व सोडलं आहे. मी संघटनेत नाही. माझी पुढची भूमिका आता पुणेकर ठरवतील. पुढच्या दोन-तीन दिवसात भूमिका जाहीर करेन. असं ते देखील त्यांनी यावेळी स्पष्ट केलं आहे. मात्र, आता पुढच्या दोन दिवसात वसंत मोरे काय भूमिका घेणार हे पाहणे देखील तितकेच महत्वाचे ठरणार आहे.

हेही पहा ----◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆
◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆
Tags