BANNER

The Janshakti News

महिलांनी स्वयंपाकघरात स्लिपर का घालावी ? डॉक्टर सांगतात बहुसंख्य बायकांचं 'हे' दुखणं थांबेल.....


=====================================
=====================================



महिलांनी स्वयंपाकघरात स्लिपर का घालावी ? डॉक्टर सांगतात बहुसंख्य बायकांचं 'हे' दुखणं थांबेल.....

जर महिलांनी स्वयंपाक घरातही कामं करताना चप्पल वापरली तर 'हा' त्रास बऱ्याच प्रमाणात कमी होऊ शकतो.

घरात चपला किंवा स्लिपर्स घालणं ही काही नुसती फॅशन नाही. तर ती गरज बनली आहे. अजूनही घरामध्ये स्लिपर्स किंवा चपला घालणं जुन्या लोकांना पटत नाही. पण हाडांशी संबंधित काही त्रास टाळायचे असतील तर मात्र महिलांनी घरात स्लिपर्स घातल्याच पाहिजेत, असं डॉक्टर सांगतात. बऱ्याच जणींना अशीही सवय असते की एरवी घरभर फिरताना स्लिपर्स वापरतात. पण स्वयंपाकघरात मात्र देव्हारा असल्याने चपला घालणं टाळतात. तिथेच नेमकी चूक होते, असं तज्ज्ञ सांगतात.

बहुतांश महिलांचा सकाळचा आणि संध्याकाळचा असा कमीतकमी प्रत्येकी दोन- दोन तासांचा वेळ स्वयंपाक घरात जातोच. स्वयंपाक घरातली बहुतांश कामे त्या उभ्यानेच करत असतात. यामुळे टाचेवर खूप दाब येतो. याचा परिणाम म्हणजे साधारण चाळिशीनंतर बहुतांश महिलांना टाचेचं दुखणं मागे लागतं.

त्यामुळेच जर महिलांनी स्वयंपाक घरातही कामं करताना चप्पल वापरली तर हा त्रास बऱ्याच प्रमाणात कमी होऊ शकतो. यासाठी ज्या चपलेचा सोल थोडा जाडसर असेल अशी चप्पल वापरावी.

जर स्वयंपाक घरात स्लिपर्स घालणं तुम्हाला अजिबातच पटत नसेल तर ओट्याच्या खाली फरशीवर एखादे जाडसर पायपुसणे अंथरुण ठेवा आणि त्या पाय पुसण्यांवर उभे राहूनच काम करा. जर पायपुसणं पातळ असेल एकावर एक दोन- तीन पायपुसणे टाका आणि त्यावर उभं राहून काम करा. यामुळेही टाचदुखीचा त्रास टाळला जाऊ शकतो, असं डॉक्टर सांगतात. 

संकलन- 
निसर्ग उपचार तज्ञ 
डॉ. प्रमोद ढेरे, पिंपरी-चिंचवड, पुणे. 
आरोग्यविषयक व्याख्याते व लेखक

हेही पहा -----



◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆
◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆
Tags