BANNER

The Janshakti News

किडनी, लिव्हरचे काम सुरळीत ठेवायचं? रोज झोपताना प्या एक खास डीटॉक्स ड्रिंक...


=====================================
=====================================
किडनी, लिव्हरचे काम सुरळीत ठेवायचं? रोज झोपताना प्या एक खास डीटॉक्स ड्रिंक...

आपल्या शरीरातील प्रत्येक अवयव अतिशय महत्त्वाचा असतो. किडनी आणि यकृत (लिव्हर) हे शरीराच्या आत असणारे अवयव महत्त्वाची भूमिका बजावत असतात. शरीरातील अनावश्यक घटक शरीराबाहेर टाकण्याचे महत्त्वाचे काम या अवयवांद्वारे केले जाते. या अवयवांच्या कार्यात अडथळे आले तर आपल्या दैनंदिन जीवनात आरोग्याच्या समस्या निर्माण होतात. म्हणूनच किडनी आणि लिव्हर या दोन्हीचे काम सुरळीत चालणे आवश्यक असते. यासाठी आपला आहार-विहार चांगला असेल तर सगळ्याच अवयवांचे कार्य सुरळीत राहते.

किडनी किंवा यकृत खराब झाले तर इतर अवयवांवर त्याचा ताण येतो आणि तेही निकामी होण्यास सुरुवात होते. किडनीतील फिल्टर खराब झाल्यास युरिक एसिड, अमोनिया, युरिया, क्रिएटीनिन, अमिनो एसिड, सोडियम, पाणी वाढते. असे काहीही होऊ नये किंवा झाले असल्यास नियंत्रणात राहावे यासाठी नेमकं काय करायला हवं? आपला आहार, झोप, व्यायाम हे सगळे चांगले असणे आवश्यक असते. त्यासाठी एका खास पेयाचा आहारात समावेश करायला हवा. अगदी झटपट होणारे हे डीटॉक्स ड्रिंक नियमित प्यायल्यास त्याचा नक्कीच चांगला उपयोग होतो. 
डीटॉक्स ड्रींकचे फायदे...

१. शरीरातील पाण्याची पातळी योग्य राखण्यास मदत. 

२. रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रणात राहण्यास मदत.

३. रक्तदाब कमी होण्यास फायदेशीर.

४. किडनी डीटॉक्स होण्यासाठी उपयुक्त.

५. एसिडीटीपासून सुटका होण्यास मदत. 

कसं करायचं हे डीटॉक्स ड्रिंक...

एक ग्लास पाणी घ्यायचं. त्यामध्ये मूठभर हिरवीगार ताजी कोथिंबीर बारीक चिरुन घालायची. यामध्ये २ वेलदोडे घालायचे. हे सगळं मिश्रण एका पातेल्यात घेऊन चांगलं उकळून घ्यायचं. आणि नतंर एका गाळणीने गाळून घ्यायचं. कोथिंबीर आणि वेलदोड्याचा अर्क उतरल्याने किडनीसाठी आणि लिव्हरसाठी हे ड्रींक अतिशय फायदेशीर ठरते. यामुळे रोज रात्री झोपण्यापूर्वी १ कप हे ड्रींक अवश्य प्यायला हवे.

संकलन-
निसर्ग उपचार तज्ञ
डॉ. प्रमोद ढेरे, पिंपरी-चिंचवड, पुणे.
आरोग्यविषयक व्याख्याते व लेखक
◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆
◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆

Tags