BANNER

The Janshakti News

आमदार डॉ. विश्वजित कदम यांच्याहस्ते भिलवडीत विविध विकास कामांचे भूमिपूजन..


=====================================
=====================================

राज्याचे माजी मंत्री आमदार डॉ.विश्वजित कदम यांच्याहस्ते गुरुवार दि.६ मार्च रोजी पलूस तालुक्यातील भिलवडी येथील आयोजित कार्यक्रमावेळी भिलवडी गावांतर्गत  विविध विकास कामांचे भूमिपूजन करण्यात आले.

1)15 व्या वित्त आयोगातून 50 लाख.
2)रोजगार हमी योजना 41 लाख.
3)सामाजिक न्याय व दलित वस्ती 30 लाख.
4)आमदार फंड 12 लाख.
5)डीपीडीसी 10 लाख.
6)स्वच्छ भारत 8 लाख.

 असे एकूण 1 कोटी 51 लाखांच्या विविध विकास कामांचे भूमिपूजन , उद्घाटन व लोकार्पण समारंभ राज्याचे माजी मंत्री आमदार डॉ.विश्वजित कदम यांच्या शुभहस्ते व रयत शिक्षण संस्था सातारा उपाध्यक्ष महेंद्र आप्पा लाड यांच्या सह आदी मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला.


यावेळी भिलवडी गावच्या सरपंच विद्याताई सचिन पाटील , उपसरपंच पृथ्वीराज पाटील , वसंतदादा पाटील सह.साखर कारखान्याचे संचालक मा. श्री. राजू दादा पाटील , सांगली जिल्हा परिषदेचे माजी सदस्य मा.श्री.संग्राम दादा पाटील , दक्षिण भाग विकास सोसायटीचे माजी चेअरमन मा.श्री.बाळासो काका मोहिते , ग्रामपंचायत माजी सदस्य मा. श्री.चंद्रकांत भाऊ पाटील , माजी  सरपंच मा.श्री.शहाजी भाऊ गुरव, तंटामुक्ती अध्यक्ष बाबासो मोहिते , शशिकांत उंडे , धनंजय दादा पाटील , महावीर किनीकर , बाळासो मोरे , मुसा शेख , बाबा शिंदे ,जावेद तांबोळी यांच्या सह ग्रामपंचायत सर्व सदस्य , कर्मचारी व ग्रामस्थ मोठया संख्येने उपस्थित होते.

लोकप्रिय आमदार डॉ. विश्वजित कदम यांचा पलूस-कडेगाव विधानसभा मतदार संघात विकासकामांचा धडाका चालू आहे. त्यामुळे नागरीकांच्यामधे उत्साहाचे वातावरण असल्याचे दिसून येत आहे.


हेही पहा -----◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆
◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆
Tags