BANNER

The Janshakti News

अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या डाटाबेसचे फर्स्ट रॅन्डमायझेशन आज संपन्न


        


 सांगली, दि. 27 (जि. मा. का.) : लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 करिता सांगली जिल्ह्यातील आठ मतदारसंघातील मतदान केंद्रासाठी नियुक्त मतदान अधिकारी व कर्मचारी यांचे उपलब्ध डाटाबेसची अर्थात पहिले सरमिसळ ( १st Randomization ) अद्ययावत माहिती जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी जिल्हाधिकारी कार्यालय सभागृहात आज घेतली.

       प्रारंभी सूचना - विज्ञान अधिकारी (NIC) यासीन पटेल यांनी NIC कडे उपलब्ध असलेला पोर्टलमधील माहिती प्रेझेंटेशनद्वारे (सादरीकरण) दिली. केंद्रीय निवडणूक आयोग यांच्याकडील RO Hand Book 2023 प्रकरण 3 मधील सुचनेनुसार तसेच मुख्य निवडणूक अधिकारी महाराष्ट्र राज्य यांच्या 16 मार्चच्या पत्रानुसार सुमारे 15 हजार 409 अधिकारी - कर्मचाऱ्यांचे फर्स्ट रॅन्डमायझेशन घेण्यात आले.

        यावेळी उपजिल्हा निवडणूक अधिकारी निता शिंदे, महसूल उप जिल्हाधिकारी राजीव शिंदे, जिल्हा माहिती अधिकारी फारूक बागवान आदी उपस्थित होते.
◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆
◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆