BANNER

The Janshakti News

जिल्ह्यातील सर्व दुय्यम निबंधक कार्यालये 29 ते 31 मार्च सुट्टीच्या कालावधीतही सुरू राहणार   सांगली, दि. 27 (जि. मा. का.) : वार्षिक मुल्यदर तक्ते 1 एप्रिल रोजी प्रसिध्द होत असल्याने दुय्यम निबंधक कार्यालयात मार्च महिन्यात दस्त नोंदणीसाठी पक्षकारांची गर्दी होत आहे, त्यामुळे  दिनांक 29 ते 31 मार्च या शासकीय सुट्टीच्या कालावधीतही जिल्ह्यातील सर्व दुय्यम निबंधक कार्यालये सुरू राहणार असल्याचे सह जिल्हा निबंधक वर्ग-1 व मुद्रांक जिल्हाधिकारी अश्विनी सोनवणे जिरंगे यांनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे कळविले आहे.

दरवर्षी मार्च अखेरनंतर एप्रिल महिन्यात जागांच्या रेडिरेकनरचे दर वाढतात, त्यामुळे लोक मार्च महिना संपण्याआधी दस्त नोंदणी करतात. गेल्या काही वर्षापासून मार्च अखेरच्या  सुट्टीच्या  दिवशीदेखील दुय्यम निबंधक कार्यालये सुरू ठेवली जात आहेत. यावर्षीदेखील शनिवारी व रविवारी कार्यालय सुरू ठेवण्यात आले. सांगली जिल्ह्यातील 13 दुय्यम निबंधक कार्यालयामध्ये सुट्टीचा  दिवस असूनही नागरिकांनी उपस्थित राहून दस्तांची नोंदणी केली आहे. दि. 23 व 24 मार्च या शासकीय सुट्टीच्या दिवशी दुय्यम निबंधक कार्यालये सुरू होती. या दोन्ही दिवशी झालेल्या 258 दस्तांच्या नोंदणीतून एकूण 85 लाख 76 हजार 390 रूपये इतका महसूल शासन जमा झाला असल्याचे प्रसिध्दी पत्रकात म्हटले आहे.
◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆
◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆