BANNER

The Janshakti News

भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र प्रदेश सदस्य एकनाथरावजी जाधव यांच्या सौजन्याने गोळवाडी गावासाठी बैठक बाकडी...======================================
======================================

वैजापूर  :        दि. 26 फेब्रुवारी 2024

वैजापूर वार्ताहर : अकिल काजी )

वैजापूर तालुक्यातील गोळवाडी येथील  विकासपुरुष , विद्यमान सरपंच भाऊसाहेब पा. शिंदे, ग्रा.प.सदस्य सुनील दादा पगार यांच्या प्रयत्नाने व भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र प्रदेश सदस्य (मा जिल्हा अध्यक्ष छ. संभाजीनगर) एकनाथरावजी जाधव  यांच्या सौजन्याने वैजापूर तालुक्यातील गोळवाडी गावासाठी बैठक बाकडी देण्यात आली.

 सदर बाकडी दक्षिण मुखी हनुमान मंदिर , ओंकारेश्वर महादेव मंदिरा समोर व नुरानी मस्जिद येथे बसविण्यात आले असून गावातील नागरिकांना सुसज्ज बैठक व्यवस्था असावी या उद्देशाने एकनाथरावजी जाधव यांच्याकडे बैठक बाकड्यांची मागणी करण्यात आली होती. या मागणीनुसार जाधव यांनी लोकांच्या सोयीसाठी बाकडी दिली असल्याची माहिती सरपंच भाऊसाहेब  शिंदे यांनी दिली.

 आज सोमवार दि. 26 फेब्रुवारी रोजी विविध मान्यवरांच्या उपस्थितीत या बैठक बाकड्यांचा लोकार्पण करण्यात आला.


  याप्रसंगी ह. भ. प. पांडुरंग महाराज पवार , रतन दादा धाडबळे, अबुजी पठाण, सोपान पा. शिंदे , साईनाथ पा. पगार, सिराज भाई शेख, दिगंबर वाघचौरे, राजू मगरे , पत्रकार अकिल काजी,फारुख शेख, हमीद शेख, अरबाज बेग, वसीम शेख. व गावकरी उपस्थित होते. 
◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆
◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆
Tags