=====================================
=====================================
मुंबई : दि. 26 फेब्रुवारी 2024
ज्येष्ठ गझल गायक पंकज उधास यांचं प्रदिर्घ आजाराने निधन झाले आहे. यांच्या निधनाने सर्वांनाच मोठा धक्का बसल्याचे बघायला मिळतंय. 72 व्या वर्षी त्यांनी मुंबई येथे शेवटचा श्वास घेतला. भारतातील उत्कृष्ट गझल गायक म्हणून पंकज उदास हे प्रसिद्ध होते. पंकज उधास यांचा जन्म १७ मे १९५१ रोजी गुजरातमध्ये झाला होता. 1980 ते 1990 च्या दशका ते भारतातील सर्वात लोकप्रिय गझल गायक बनले. त्यांनी त्यांच्या मधुर आवाजाने भारतीयांचे मन जिंकले होते. भारतातच नाही तर परदेशात देखील त्यांचा मोठा चाहता वर्ग आहे.
भारतातील सर्वात लोकप्रिय ज्येष्ठ गझल गायक पंकज उधास यांना " द जनशक्ती न्यूज " परीवाराकडून भावपूर्ण श्रद्धांजली..!
◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆