BANNER

The Janshakti News

पलूस च्या तहसीलदार म्हणून दीप्ती रिटे यांनी कार्यभार स्वीकारला ; पदभार स्वीकारताच घेतला कामकाजाचा आढावा


                               VIDEO


====================================
============================

पलूस वार्ताहर :          दि. 9 फेब्रुवारी 2024

पलूस तालुक्याचे तहसीलदार म्हणून दीप्ती  रिटे यांनी आपल्या पदाचा कार्यभार स्वीकारला. त्या मुळच्या सातारा जिल्ह्याच्या असून 2019 मध्ये त्यांनी तहसीलदार म्हणून पुणे जिल्हाधिकारी कार्यालय तसेच सातारा जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये पुनर्वसन विभागात तहसीलदार म्हणून उल्लेखनीय कार्य केले होते . त्यानंतर त्यांची बदली पलूस तालुक्यामध्ये झाली आहे. पलूस तालुक्याचे तहसीलदार निवास ढाणे यांचा कार्यकाल पूर्ण झाल्याने त्यांच्या जागी पलूस च्या तहसीलदार म्हणून दीप्ती रिटे या रुजू झाल्या आहेत.बुधवारी त्यांनी आपल्या तहसीलदार पदाचा कार्यभार स्वीकारला. यावेळी त्यांचे स्वागत करण्याकरिता प्रशासकीय विभागातील अधिकारी, मंडलाधिकारी, तलाठी तसेच राजकीय पक्षाचे कार्यकर्ते यांनी उपस्थिती लावली होती.
पदभार स्वीकारल्यानंतर त्यांनी सर्व विभागाची ओळख परेड करून घेतली तसेच कामकाजाचा आढावा घेतला.यावेळी पत्रकारांशी बोलताना तहसीलदार दीप्ती रिटे म्हणाल्या, सर्वसामान्यांच्या अडीअडचणी  सोडवण्याकरिता मी कटिबद्ध राहीन.

हेही पहा ----


◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆
◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆