BANNER

The Janshakti News

औषध न घेता Acidity दूर करण्याचा बेस्ट फंडा, पोटाच्या समस्याही होतील दूर.....


=====================================
=====================================


पोटात जळजळ किंवा अ‍ॅसिडिटी एक कॉमन समस्या आहे. ज्यामुळे लोक नेहमीच वैतागलेले असतात. तिखट, मसालेदार, तळलेले पदार्थ खाल्ल्याने, तणाव किंवा चुकीच्या लाइफस्टाईलमुळे ही समस्या होते. ही समस्या दूर करण्याचे अनेक उपाय आहेत. पण आज आम्ही तुम्हाला एक सोपा उपाय सांगणार आहोत. 

नुकत्याच करण्यात आलेल्या एका रिसर्चमध्ये आढळलं की, नियमितपणे चालल्याने अ‍ॅसिडिटीचे लक्षण कमी करण्यास आणि भविष्यात त्याचा धोका कमी करण्यास मदत होते. या रिसर्चमध्ये लोकांना आढळलं की, जे लोक 12 आठवडे रोज 30 मिनिटे पायी चालले त्यांची अ‍ॅसिडिटीची लक्षणे खूप कमी झाली. या लक्षणांमध्ये छातीत जळजळ, पोट फुगणं, आंबट ढेकर आणि अस्वस्थता यांचा समावेश आहे.

कसा मिळतो फायदा...?

पायी चालल्याने पोटाच्या मांसपेशींना उत्तेजना मिळते, ज्यामुळे पचनक्रिया वेगवान होते. अन्न सहजपणे पचतं आणि पोटात अ‍ॅसिडची निर्मिती कमी होते. त्याशिवाय पायी चालल्याने तणाव कमी होतो, जो अ‍ॅसिडिटीची समस्या वाढण्याचं एक मुख्य कारण आहे.

पायी चालण्याचे फायदे...

पचनक्रिया सुधारते...

पायी चालल्याने शरीराची हालचाला होते, ज्यामुळे पचनक्रियेला गती मिळते. अन्न चांगलं पचतं आणि पोटात अ‍ॅसिड कमी तयार होतं.

पोटाच्या मांसपेशी मजबूत होतात...

पायी चालल्याने पोटाच्या मांसपेशी मजबूत होतात, ज्यामुळे अन्न खाली सरकवण्याची क्षमता वाढते. तसेच अ‍ॅसिड पुन्हा परत येण्याचा धोकाही कमी राहतो.

तणाव कमी होतो...

तणावामुळे अ‍ॅसिडिटी वाढते. पायी चालल्याने तणाव कमी करण्यास मदत मिळते आणि मन शांत राहतं. ज्यामुळे आपोआप अ‍ॅसिडिटीची समस्या कमी होते.

वजन कमी करण्यास मदत...

अ‍ॅसिडिटीची समस्या अनेकदा लठ्ठपणाशी जुळलेली असते. पायी चालल्याने वजन कमी करण्यास मदत मिळते. ज्यामुळे अ‍ॅसिडिटीची समस्या कमी होण्यास मदत मिळते.

संकलन- 
निसर्ग उपचार तज्ञ 
डॉ. प्रमोद ढेरे, पिंपरी-चिंचवड, पुणे.
आरोग्यविषयक व्याख्याते व लेखक

हेही पहा ----




◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆
◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆
Tags