BANNER

The Janshakti News

भारती विद्यापीठ बाल विकास मंदिर व प्राथमिक शाळा. तुरची फाटा ; वार्षिक स्नेहसंमेलन व बक्षीस वितरण समारंभ...




     
                                     VIDEO


                                       

=====================================
=====================================

तासगाव / तुरची : वार्ताहर    १० फेब्रुवारी २०२४

भारती विद्यापीठ बाल विकास मंदिर व प्राथमिक शाळा. तुरची फाटा ता.तासगाव येथे  बुधवार दि. ७ फेब्रुवारी रोजी विविध मान्यवरांच्या उपस्थितीत वार्षिक स्नेहसंमेलन व बक्षीस वितरण समारंभ पार पडला.

    या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून  कॅनडा देशातील रहिवासी असणाऱ्या व मूळच्या भारतीय वंशाच्या महाराष्ट्रीयन असणाऱ्या आंतरराष्ट्रीय नामांकित एनजीओ संस्थेच्या संस्थापक अध्यक्षा मा. सौ.शर्मिला किसन गुंजाळ व त्यांचे  पती मा.प्रो.किसन गुंजाळ तसेच भारती विद्यापीठ कन्या प्रशाला पुणे, माजी मुख्याध्यापिका मा.सौ .वनिता घोरपडे  , भारती हॉस्पिटलच्या वैद्यकीय अधिकारी मा. सौ.गणेशकर मॅडम, येळावी केंद्राचे केंद्रप्रमुख मा. श्री. विजयकुमार जाधव,शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष मा. श्री.क्रांतीकुमार यादव उपाध्यक्ष मा.सौ. उषा हिवरे , शाळेचे मुख्याध्यापक मा.श्री.विलास मोरे यांच्या सह आदी मान्यवर यांच्या उपस्थितीत संपन्न झाला.
    यावेळी प्रमुख पाहुण्यांनी शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना शालेय गणवेशाचे वाटप केले. तसेच विद्यार्थ्यांच्या अभ्यासासाठी  नवनवीन तंत्रज्ञान शिकण्यासाठी शाळेला लॅपटॉप ही दिला.        
        
  यावेळी त्या बोलताना म्हणाल्या की, आपल्या शाळेतील सर्व विद्यार्थी हे मातृभाषेतून शिक्षण घेत असताना त्यांना आंतरराष्ट्रीय दर्जाचे शिक्षण मिळाले पाहिजे.
   असे दर्जेदार शिक्षण घेऊन त्यांना संपूर्ण जगभरात  वावरत आले पाहिजे. याबद्दल सर्व विद्यार्थी व पालकांना त्यांनी मार्गदर्शन केले.   
      यावेळी शाळेतील सर्व विद्यार्थी, पालक, सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆
◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆