BANNER

The Janshakti News

पिण्याच्या व शेतीच्या पाण्याचे नियोजन करा... अन्यथा पलूस तहसील समोर आंदोलन --- संदीप राजोबा

                        
                               VIDEO



=====================================
=====================================

पलूस : वार्ताहर            १० फेब्रुवारी २०२४

 कृष्णा नदी सातत्याने कोरडी पडत असल्याने पिण्याचे व शेतीसाठी पाणीटंचाईची समस्या निर्माण  होत असल्याबाबत स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने पलूस चे तहसीलदार सौ. दीप्ती रिटे यांना निवेदन देण्यात आले.

पलूस तालुक्यातील अंकलखोप , भिलवडी , ब्रम्हनाळ , सुखवाडी , चोपडेवाडी , आमनापूर , धनगाव या ठिकाणाहून पिण्याच्या पाणीपुरवठा योजना कार्यरत आहेत. जलसिंचन विभागाच्या ढिसाळ नियोजनामुळे वारंवार कृष्णा नदीचे पात्र मागील वर्षापासून कोरडे पडत असून त्यामुळे नागरिकांना पिण्यासाठी  तसेच शेतीसाठी पाणी मिळत नाही. पिण्याच्या पाण्यामध्ये सांडपाणी मिसळत असलेने तेच दुर्गंध युक्त पाणी नागरिकांना पिण्यास भाग पडते  या कारणास्तव पाणीपुरवठ्याच्या योजना बंद राहतात त्यावेळी लोकांचा नाईलाज असतो त्यावेळी इतर ठिकाणाहून पिण्यासाठी पाणी उपलब्ध करावे  लागते त्यातूनही पाणीपुरवठा योजना चालू ठेवलेस सांडपाणी थेट नदीत मिसळत असल्याने गॅस्ट्रो , ताप-थंडी , उलट्या होणे व इतर आजाराचे मोठ्या प्रमाणामध्ये लागण होते. 
तसेच सध्या ऊस तोडीचा हंगाम सुरू असल्याने तुटून गेलेल्या उसाला पुन्हा खोडवा फुटण्यासाठी व लागण केलेल्या उसाला व गहू हरभरा या पिकांना देखील तात्काळ पाणी देण्याची गरज असते धरणामध्ये पाणी असून देखील नियोजनाअभावी राजकीय वादातून नदी कोरडी पडते त्यामुळे शेतकऱ्यांचे पीक वाळून पुन्हा मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान होते तरी वरील सर्व बाबींचा गांभीर्यपूर्वक विचार करून  आपल्या माध्यमातून जलसिंचन विभागाशी संपर्क साधून योग्य ते नियोजन व्हावे त्यासाठी शेतकऱ्यांची पाणी व्यवस्थापन कमिटी आपल्या अध्यक्षतेखाली स्थापन व्हावी अशी निवेदनाद्वारे मागणी करण्यात येत आहे.
 

  खऱ्या अर्थाने हे काम आमदार खासदारांनी करायला पाहिजे परंतु आमदार खासदार हे स्वतःच्या तालुक्यात पुरते काम करत आहेत. तसे न करता त्यांनी या पूर पट्ट्यातील गावांचा सुद्धा विचार करावा. तातडीने मागण्या मान्य कराव्यात , मागण्या मान्य न झाल्यास स्वाभिमानी शेतकरी संघटना पलूस तहसील कार्यालयासमोर जोपर्यंत पाणी प्रश्न निकाली निघणार नाही तोपर्यंत  आंदोलन करेल व होणाऱ्या सर्व परिणामांची जबाबदारी ही प्रशासनाची राहील...संदीप राजोबा

 यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते संदीप राजोबा , जिल्हाध्यक्ष सूर्यकांत मोरे , तालुकाध्यक्ष धन्यकुमार पाटील , राजू पाटील , प्रकाश पाटील , बाबुराव शिंदे , सुधीर जाधव , अमोल पाटील व शेतकरी  यावेळी उपस्थित होते. 




तहसीलदार दिप्ती रिटे , नायब तहसीलदार पाटील स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते संदीप राजोबा , सूर्यकांत मोरे , धन्यकुमार पाटील , राजू पाटील आदी.

◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆
◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆