BANNER

The Janshakti News

जायंट्सरत्न उद्योजक कै. काकासाहेब चितळे यांच्या चतुर्थ पुण्यतिथीनिमित्त भिलवडीत मोफत नेत्र तपासणी व शस्त्रक्रिया शिबिर मोठ्या उत्साहात संपन्न...


                            VIDEO




====================================
====================================

भिलवडी वार्ताहर :
 
भिलवडी ता.पलूस येथे जायंट्सरत्न उद्योजक  कै. काकासाहेब चितळे यांच्या चतुर्थ पुण्यतिथीनिमित्त जायंट्स ग्रुप ऑफ भिलवडी, सहेली, यंग जायन्ट्स, माता बाल संगोपन केंद्र  व नॅब नेत्र रुग्णालय मिरज यांचे मार्फत मोफत नेत्र तपासणी व शस्त्रक्रिया शिबिर गुरुवार दिनांक  8 फेब्रुवारी रोजी मोठ्या उत्साहात संपन्न झाले.



  या शिबिराचे उद्घाटन उद्योजक श्री गिरीश चितळे यांच्या हस्ते व माजी सरपंच श्री विजयकुमार चोपडे,  पोलीस पाटील श्री विनायक चौधरी, शशिकांत कुलकर्णी, जायन्ट्स ग्रुपचे सर्व पदाधिकारी व सभासद  तसेच पत्रकार यांच्या उपस्थितीत पार पडले. 
  या शिबिरामध्ये 201 रुग्णांची मोफत तपासणी करून  89 रुग्णांना शस्त्रक्रियेसाठी पाठवण्यात आले. गेल्या २५ वर्षांपासून ही परंपरा सुरू आहे.
 हे शिबिर व्यवस्थित पार पाडण्यासाठी चितळे कुटुंबियांचे मोठे योगदान असते.


हेही पहा -----





◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆
◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆
Tags