BANNER

The Janshakti News

महात्मा गांधी व्यक्ती नव्हते विचार होते, त्यांच्या मूल्यांचा आपल्या जीवनात अवलंब करणे हीच त्यांना खरी श्रद्धांजली...शरद लाड


=====================================
=====================================

कुंडल : वार्ताहर        दि. 30 जानेवारी 2024  

महात्मा गांधी व्यक्ती नव्हते विचार होते, त्यांच्या मूल्यांचा आपल्या जीवनात अवलंब करणे हीच त्यांना खरी श्रद्धांजली असेल असे प्रतिपादन क्रांतीचे अध्यक्ष शरद लाड यांनी केले.

ते कुंडल (ता.पलूस) येथील क्रांतिअग्रणी डॉ. जी. डी. बापू लाड सहकारी साखर कारखान्यावर महात्मा गांधींना पुण्यतिथी निमित्त त्यांच्या प्रतिमेला पुष्प वाहून अभिवादन करताना बोलत होते.

शरद लाड म्हणाले, व्यक्तीला मारले जाते पण त्याच्या विचाराला मारले जात नाही. महात्मा गांधीजींच्या विचारांची आजही देशाला गरज आहे.   त्यांना कोणी मारले? यापेक्षा अशा व्यक्तींचे विचार दडपणे हेच एक क्रौर कृत्य आहे. आजही देशाची ओळख महात्मा गांधीजींमुळे अबाधित आहे त्यांच्याच प्रेरणेने क्रांतिअग्रणी डॉ. जी.डी. बापूंसारखे हजारो स्वातंत्र्य सैनिक घडले अशा प्रेरणादायी विचारांचा आणि आचारांचा जागर आयुष्यभर आपण करूया असे आवाहन यानिमित्ताने लाड यांनी केले.

यावेळी क्रांती स्कुलचे रणजित लाड, विक्रांत लाड, संचालक जितेंद्र पाटील, अनिल पवार, जयप्रकाश साळुंखे, बाळकृष्ण दिवाण, किरण गावडे, कार्यकारी संचालक सी.एस.गव्हाणे, आप्पासाहेब कोरे, विलास जाधव यांच्यासह कर्मचारी उपस्थित होते.


महात्मा गांधीजींना अभिवादन करताना शरद लाड, रणजित लाड, विक्रांत लाड आणि मान्यवर

◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆
◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆