BANNER

The Janshakti News

भारताच्या 75 व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त भिलवडीत रक्तदान शिबीर संपन्न..

अनेक रक्तदात्यांनी स्वयंस्फूर्तीने केले रक्तदान


=====================================
=====================================

भिलवडी / प्रतिनिधी        २९ जानेवारी २०२४

 अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ सेवा व आध्यात्मिक बालसंस्कार दिंडोरी (प्रनित) सेवा केन्द्र, भिलवडी व बॉम्बे ब्लड ग्रुप ऑर्गनायझर, इंडीया
ओ.एच.एच. रेअर ब्लड ग्रुप असोसिएशन ट्रस्ट, तासगांव यांच्या संयुक्त विद्यमाने काल रविवार दि. २८ जानेवारी रोजी सकाळी १० ते सायंकाळी ५ यावेळेत श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र भिलवडी ता.पलूस येथे रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले होते. 
दरम्यान अनेक रक्तदात्यांनी उत्स्फूर्तपणे रक्तदान केले.



                    

 आपल्या देशात दर दोन सेकंदामागे एकाला रक्तपुरवठ्याची  गरज भासते. आपल्यातील तीन जणांपैकी दोघांना आयुष्यात एकदा तरी रक्ताची आवश्यकता निर्माण होते. कारण विज्ञानाने कितीही प्रगती केली, तरी मानवी रक्ताला अजूनही पर्याय मिळालेला नाही. म्हणूनच रक्तदानाचा अर्थ जीवनदान असा होतो. आपल्या देशाच्या लोकसंख्येपैकी 60 टक्के रक्तदान करण्यासाठी सक्षम असतात. पण वर्षाकाठी यातले एक टक्का इतकेच रक्तदानासाठी पुढे येतात. त्यामुळे आपल्या देशाला दरवर्षी सुमारे 30 लाख युनिट्स इतकी रक्ताची कमतरता भासते. याच कारणामुळे रक्तदान हा आपल्या कर्तव्याचा भाग ठरतो. याची जाणीव ठेवून रक्तदान शिबीराचे आयोजन केले होते असे श्री स्वामी समर्थ सेवा केंद्रातील सेवेकरी तथा सांगली जिल्हा निरिक्षक वंसंत धोतरे यांनी सांगितले.


या शिबिराचे उद्घाटन सांगली जिल्हा परिषद माजी सदस्य संग्राम दादा पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी बॉम्बे ब्लड ग्रुप ऑर्गनायझर, इंडीया ओ.एच.एच. रेअर ब्लड ग्रुप असोसिएशन ट्रस्ट चे संस्थापक विक्रम यादव व त्यांचे सहकारी , चद्रकांत पाटील ग्रा.पं माजी सदस्य , मनोज चौगुले ग्रा. पं. सदस्य
पृथ्वीराज पाटील ग्रा.पं.उपसरपंच बाबासो शिंदे ग्रा.पं.माजी सदस्य
संदिप मोरे सांगली जिल्हा निरिक्षक ,
वंसंत धोतरे सांगली जिल्हा निरिक्षक ,
राजेन्द्र माने ,रोहीत नलवडे ,विक्रम फडतरे यांच्यासह श्री स्वामी समर्थ सेवा केंद्रातील सेवेकरी , ग्रामस्थ व सामाजिक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 श्री स्वामी समर्थ सेवा केंद्रातील सेवेकरी , माता ,बंधू-भगिनी यांच्या सह आदींनी यासाठी परिश्रम घेतले.

हेही पहा -----



◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆
◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆