=====================================
=====================================
पलूस वार्ताहर : 30 जानेवारी 2024
सांगली जिल्हातील पलूस येथे तहसील कार्यालयात संपूर्ण तालुक्यासाठी संजय संजय गांधी निराधार योजनेचे एकमेव कार्यालय आहे. येथे कामानिमित्त रोज अनेक दिव्यांग नागरिक तालुक्यातून येतात. पेन्शन योजनेसाठी येणाऱ्यांची संख्या जास्त आहे. गर्दी जास्त असल्याने काम होण्यासाठी बराच वेळ थांबावे लागते. काही वेळा तर तासनतास रांगेत उभे रहावे लागते. त्यामुळे दिव्यांगांचे हाल होतात. दिव्यांगांच्या दृष्टीने महत्त्वाच्या असणाऱ्या गरजा पूर्ण करण्यासाठी तसेच दिव्यांग बांधवांच्या विविध प्रकारच्या समस्या सोडवून त्यांना शासनाच्या योजनांचा लाभ मिळावा यासाठी तहसील कार्यालयात कार्यालयीन वेळेत प्रत्येक महिन्यातील एक दिवस दिव्यांग बांधवांसाठी निश्चित करण्यात यावा. या मागणीसाठी संघर्ष दिव्यांग संघटना महाराष्ट्र राज्य , संस्थापक अध्यक्ष शंकर सर्जे यांच्या मार्गदर्शनाखाली संघर्ष दिव्यांग संघटना सांगली जिल्हा यांच्या वतीने सोमवार दि. 29 जानेवारी रोजी पलूस चे तहसीलदार निवास ढाणे यांना निवेदन देण्यात आले.
यावेळी संघर्ष दिव्यांग संघटनेचे जिल्हाध्यक्ष श्री सुनील दाशाळ जिल्हा उपाध्यक्ष संतोष सावंत ज्येष्ठ मार्गदर्शक बाळकृष्ण पवार व स्वामी विवेकानंद दिव्यांग फाउंडेशनचे अध्यक्ष दत्तात्रय पाटील व उपाध्यक्ष मधुकर कुंभार तसेच सचिन जाधव अजित होमकर सर्जेराव शिंदे बाळासाहेब पाटील असलम नदाफ व इतर कार्यकर्ते उपस्थित होते.
◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆
◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆