BANNER

The Janshakti News

पलूस तालुका कृषि अधिकारी यांना निलंबित करा. राजेश गायगवाळे जिल्हाध्यक्ष, वंचित बहुजन आघाडीची ठिय्या आंदोलनाद्वारे मागणी.



                                व्हिडीओ
                                       👇



====================================
====================================
 
 सांगली वार्ताहर  (ता.९) :     पलूस कडेगाव विधानसभा क्षेत्राचे विद्यमान आमदार डॉ. विश्वजित कदम यांच्या कृषि राज्य मंत्री पदाच्या कार्यकाळात त्यांच्याच मतदारसंघातील पलूस तालुक्यातील कृषि विभागातील औषध फवारणी यंत्र अनुदान प्रकरणी कोट्यावधी रुपयांचा भ्रष्टाचार झाला असून यातील दोषींवर कठोर कारवाई करण्याच्या मागणीसाठी वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष राजेश गायगवाळे यांच्या नेतृत्वाखाली जिल्हा कृषि अधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करण्यात आले.
       पलूस तालुक्यातील औषध फवारणी यंत्र प्रकरणात अनेकांनी यंत्र खरेदी न करता शासनाचे अनुदान घेतले असून यातील औषधयंत्र विक्रेत्याला परवानगी नसताना बोगस प्रमाणपत्र तयार करून यंत्र विक्री केली असलेचे निदर्शनास येत आहे. तसेच काही शेतकऱ्यांना दिलेले फवारणी यंत्र हे अतिशय निकृष्ट दर्जाचे असलेचे देखील निवेदनात म्हटले आहे.
  सदर प्रकरणी 4 महिन्यापासून चौकशी व कारवाईसाठी वंचित बहुजन आघाडी पाठपुरावा करत असून चौकशी समितीने विश्वासात न घेता चुकीचे पद्धतीने तपास केलेने या कार्यालयाचा निषेध व्यक्त करत पुढील 15 दिवसात पलूस तालुका कृषी अधिकारी यांना निलंबित करण्यात यावे तसेच बोगस अनुदान लाटणारे व बोगस औषध फवारणी यंत्र विक्रेत्यावर  फौजदारी गुन्हे दाखल न झालेस तीव्र आंदोलन करणार असल्याचा इशारा जिल्हाध्यक्ष गायगवाळे यांनी दिला.




       यावेळी वंचित कामगार संघटनेचे नेते संजय कांबळे, अक्षय बनसोडे, स्वप्नील खांडेकर, विशाल धेंडे, जगदीश कांबळे, परशुराम कांबळे, शाकिब पटेल यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते.


◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆
◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆