BANNER

The Janshakti News

लिव्हर निरोगी ठेवण्यासाठी सगळ्यात बेस्ट आहे 'हे' फळ, दूर होतील अनेक गंभीर समस्या.....=====================================
=====================================


लिव्हरच्या माध्यमातून शरीरातील टॉक्सिन बाहेर काढणे आणि ब्लड शुगर लेव्हल कंट्रोल करणे अशी कामे केली जातात. त्याशिवाय लिव्हरच्या मदतीने फॅट कमी करणे आणि कार्बोहायड्रेट स्टोर केले जातात. जर या अवयवात जराही बिघाड झाला तर त्याचा प्रभाव पूर्ण शरीरावर पडतो. प्रसिद्ध हेल्थ एक्सपर्ट निखील वत्स यांनी सांगितलं की, एक असं फळ आहे जे लिव्हर चांगलं ठेवण्यासाठी फार फायदेशीर आहे.


आवळ्याचे फायदे...

आवळ्याचा उपयोग सामान्यपणे केस आणि त्वचेच्या वेगवेगळ्या समस्या दूर करण्यासाठी केला जातो. पण तुम्हाला हे माहीत नसेल की, आवळ्याचं सेवन करून तुम्ही फॅटी लिव्हरची समस्या दूर करू शकता. आवळ्यात व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणात असतं. त्यामुळे याने इम्यूनिटी बूस्ट होऊन अनेक प्रकारच्या संक्रमणापासून तुमचा बचाव होतो. ज्या लोकांचं पचनतंत्र कमजोर असतं त्यांच्यासाठी आवळा बेस्ट उपचार आहे. 

लिव्हरसाठी फायदेशीर...

आवळा आपल्या शरीरासाठी एखाद्या सुपरफूडसारखा आहे आहे. याने डायबिटीस, इनडायजेशन, डोळ्यांची समस्या आणि लिव्हरची कमजोरी यासोबत लढण्यास मदत मिळते. याने मेंदूही मजबूत होतो. सोबतच कॅन्सरसारख्या गंभीर आजारांपासूनही बचाव होतो. जे लोक याचं नियमितपणे सेवन करतात त्यांना हार्ट अटॅकचा धोकाही कमी राहतो. लिव्हरला होणाऱ्या फायद्याबाबत सांगायचं तर आवळ्याने लिव्हरला सुरक्षा मिळते. कारण याने विषारी पदार्थ बाहेर निघतात. या फळाद्वारे शरीरातील हायपरलिपिडिमीया आणि मेटाबॉलिज्म सिंड्रोमही कमी केला जातो.

कस कराल सेवन...?

आवळा खाण्याच्या वेगवेगळ्या पद्धती आहेत. सर्वात कॉमन पद्धत म्हणजे आवळा थेट चावून चावून खावा. ज्या लोकांना फॅटी लिव्हरची समस्या आहे ते लोक काळ्या मिठासोबत याचं सेवन करू शकतात. त्याशिवाय तुम्ही सकाळी उठून आवळ्याचा चहाही घेऊ शकता. असं केल्याने काही दिवसातच फरक दिसू लागेल.

संकलन- 
निसर्ग उपचार तज्ञ
डॉ. प्रमोद ढेरे, पिंपरी-चिंचवड, पुणे. 
आरोग्यविषयक व्याख्याते व लेखक

हेही पहा -----
◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆
◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆
Tags