BANNER

The Janshakti News

आमदार डॉ.विश्वजीत कदम यांच्याहस्ते विकासकामांचे भूमिपूजन=====================================
=====================================

भिलवडी वार्ताहर :        दि. ८ जानेवारी २०२४

वसगडे ता.पलूस येथे विविध विकास कामांचा भूमिपूजन व लोकार्पण समारंभ माजी राज्यमंत्री आ.डॉ. विश्वजीत कदम व जिल्हा बँकेचे संचालक महेंद्र लाड यांच्या शुभहस्ते पार पडला.  

पाचवा मैल - माळवाडी रस्ता ते हजारे मळा रस्ता जनसुविधा योजनेतून खडीकरण व डांबरीकरण करणे. रक्कम ७ लाख रुपये याचे भूमिपूजन,

 पाचवा मैल - माळवाडी रस्ता ते खोकडे मळा रस्ता आमदार फंडातून खडीकरण व डांबरीकरण करणे याचे  भूमिपूजन रक्कम - ८ लाख रुपये,  

दलित वस्ती सुधारणा योजनेतून बौद्ध समाजासाठी १० लाख रक्कमेतून समाज मंदीर बांधणे याचे भूमिपूजन 

 यांसह जिल्हा नियोजनातून ६१ लाख रक्कमेतून आयुर्वेदिक व युनानी दवाखान्याचे लोकार्पण, आमदार फंडातून १० लाख रक्कमेतून तयार केलेल्या आयुर्वेदिक दवाखाना ते महावीर फकीर घर रस्ता खडीकरण व डांबरीकरणाचे लोकार्पण

वसगडे रेल्वे गेट ते वसगडे कमान रस्ता रुंदीकरण व दोन्ही बाजूस आर. सी. सी. गटार करणे रक्कम ३ कोटीचा भूमिपूजन सोहळा संपन्न झाला.


यावेळी माजी पं.स. सदस्य अमोल पाटील, सरपंच वृषाली काशीद, उपसरपंच अनिल पाटील, रावसाहेब पाटील, प्रकाश ग्रुप सोसायटीचे चेअरमन संजय गायकवाड, नंदू दादा कदम, परशुराम यादव,उदयकुमार पाटील, राजेंद्र यादव सर्व ग्रामपंचायत सदस्य, इतर संस्थेचे पदाधिकारी व  ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

हेही पहा ----◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆
◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆