BANNER

The Janshakti News

वसगडे येथील भंगार विक्री प्रकरण ; पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल=====================================
=====================================
भिलवडी वार्ताहर :          ८ जानेवारी २०२४

वसगडे येथील ग्रामपंचायत मालकीचे परस्पर भंगार विक्री प्रकरणी भिलवडी पोलीस ठाण्यामध्ये तिघा विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत भिलवडी पोलीसांनी दिलेली  माहिती अशी की,

 महावीर शिवगोंडा पाटील, रणजीत युवराज सावंत,दिनेश रमेश वाघमारे सर्वजण रा. वसगडे ता. पलुस जि. सांगली यांनी वसगडे ग्रामपंचायतचे खटाव रोडलगत असलेले नळपाणी पुरवठा योजनेचे फिल्टर हाऊस मधील खोलीत ठेवलेले भंगार साहीत्याचा अपहार करून, बेकायदेशीररित्या परस्पर विक्री करून, वसगडे ग्रामपंचायत कार्यालयाची फसवणुक केली आहे. अशी फिर्याद वसगडे ग्रामपंचायतीचे ग्रामविकास अधिकारी विकास आनंदराव महाडीक यांनी भिलवडी पोलीस ठाण्यात दिली असून, त्यानुसार भिलवडी पोलिसांत संबंधितांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


घटनेचा अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली भिलवडी पोलीस करीत आहेत.
◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆
◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆