BANNER

The Janshakti News

चोपडेवाडी गावच्या विकासासाठी कटिबद्ध - आ.डॉ.विश्वजीत कदम



====================================
====================================

भिलवडी वार्ताहर :  दि. ९ जानेवारी २०२४

भिलवडी : गटातटाचा विचार न करता कै. शिवराम बापूंच्या चोपडेवाडी गावच्या विविध विकासांसाठी वचनबद्ध आहे. कामाला मर्यादा असल्या तरीही ती कामे तात्काळ केली जातील अशी ग्वाही आ.डॉ.विश्वजीत कदम यांनी दिली.
चोपडेवाडी ता.पलूस येथे ६ कोटी ५० लाख रक्कमेच्या कामांचा लोकार्पण सोहळा व भूमिपूजन समारंभ पार पडला. यावेळी ते बोलत होते.
चोपडेवाडी-भिलवडी गावादरम्यानच्या सरळी पुल ३ कोटी ३८ लाख खर्चून बांधण्यात आला. त्याचा लोकार्पण सोहळा संपन्न झाला. चोपडेवाडी गावाला महापुरातून बाहेर पडण्यासाठी चोपडेवाडी-कदम मळा रस्त्याचे भूमिपूजन करण्यात आले. त्यासाठी २ कोटी ९१ लाख व चोपडेवाडी गावाला पिण्याच्या पाण्यासाठी वॉटर एटीएम सुविधा भूमिपूजन समारंभ संपन्न झाला. या योजनेसाठी आमदार फंडातून ४ लाख ५० हजार मंजूर करण्यात आले आहेत.


सरपंच प्रशांत माने यांच्यासह माजी जि.प.सदस्य संग्राम पाटील, वसंत शेळके, रामचंद्र माने, रविंद्र यादव, दिलीप माने, महादेव मोरे, सुरेश माने, पोलीस पाटील रेखा यादव उपस्थित होते. स्वागत प्रा. संतोष माने तर आभार राहुल माने यांनी मानले.
◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆
◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆