BANNER

The Janshakti News

सिनियर सेक्शन इंजिनियर सिग्नल मिरज विभागाचे वतीने श्रीराम मुर्ती स्थापना व भोजनदान कार्यक्रम उत्साहानं संपन्न.


रिपब्लिकन पक्षाचे युवक सांगली जिल्हाध्यक्ष मा. श्वेतभैया यांनी उपस्थित राहून सर्वांना श्रीराम मुर्ती स्थापनेच्या दिल्या शुभेच्छा.

                              VIDEO
                                    👇




=====================================
=====================================

मिरज वार्ताहर :         दि. २२ जानेवारी २०२४

आज दि. २२ जानेवारी रोजी मध्य रेल्वे पुणे विभागाचे सिनीयर सेक्शन इंजिनिअर सिग्नल मिरज डेपो यांचे वतीने श्रीराम जन्मभूमी मुर्ती प्रतिस्थापनेच्या निमित्ताने भव्य सत्यनारायण पुजा व भोजनदान कार्यक्रमाचे आयोजन करणेत आले होते.
यावेळी प्रथम सकाळी सत्यनारायण पुजा संपन्न करून दुपारी १२ वा. पासून भोजनदान करणेत आले. सदर कार्यक्रमाचे वेळी मध्य रेल्वे पुणे व सोलापूर विभागाचे रेल्वे अधिकारी मा. पियुष कुंभार (Dste, pune ),मा. दीपक भाटी (AE), मा. मनोज कुमार भादोरीया (Adst) ,मा.अनिरुद्ध लाड (sse, telicom),रिपब्लिकन(आठवले) पक्षाचे युवक सांगली जिल्हाध्यक्ष मा. श्वेतपद्म विवेकरावजी कांबळे, आय.टी.सेलचे सांगली जिल्हाध्यक्ष मा. योगेंद्र कांबळे, मिरज शहर अध्यक्ष मा. अविनाश कांबळे, शहर जिल्हा संघटक मा. सुमित कांबळे आदी मान्यवर मंडळी उपस्थित होते.
यावेळी उपस्थित मान्यवरांना श्रीराम मंदिराची प्रतिकृती व गुलाब पुष्प देऊन सन्मानित करणेत आले. यावेळी जवळपास एक हजार श्रीराम भक्तांनी भोजनदानाचा लाभ घेतला.
कार्यक्रमाचे नियोजन मध्य रेल्वेचे सिनियर सेक्शन इंजिनियर सिग्नल मिरज डेपोचे प्रमुख मा. श्यामजी जयस्वाल साहेब, मा. अमित कांबळे,मा.सुमित कांबळे, मा.वेंकटेश जेली, मा.अमोल दबडे, मा.धारासिंह मीना, मा.मारुती निकम व स्टाफ मंडळी यांनी केले होते. यावेळी मध्य रेल्वे मिरज विभागाचे वरिष्ठ अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

हेही पहा ----



◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆
◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆
Tags