BANNER

The Janshakti News

आमदार डॉ. विश्वजीत कदम यांच्या हस्ते खटाव येथे विविध विकास कामांचे भूमिपूजन व उद्घाटन संपन्न...


=====================================
=====================================

भिलवडी वार्ताहर :  दि. २३ जानेवारी २०२४

खटाव ता. पलूस येथे आ. डॉ. विश्वजीत कदम यांच्या विशेष प्रयत्नातून एकूण ३ कोटी ८५ लाख रक्कमेचे भूमिपूजन व उद्घाटन कार्यक्रम सोमवार दि.२२ रोजी विविध मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला.
यामध्ये सटवाई रस्ता खडीकरण व डांबरीकरण करणे, दलित वस्ती स्मशानभूमी ते विजय भिकू कांबळे घर रस्ता खडीकरण व डांबरीकरण करणे,  तलाठी कार्यालय निवास इमारत बांधणे, ग्रामसचिवालय इमारत बांधणे यांसह गावामध्ये विविध ठिकाणी घरकुल योजनांचे भूमिपूजन आमदार डॉ. विश्वजित कदम यांच्याहस्ते संपन्न झाले. 



यावेळी जिल्हा बँक संचालक महेंद्र लाड, सरपंच ओंकार पाटील, उपसरपंच श्रीकृष्ण पाटील, ग्रामपंचायत सदस्य यांच्यासह जेष्ठ व युवक कार्यकर्ते, ग्रामस्थ तसेच महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.


हेही पहा ----



◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆
◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆
Tags