BANNER

The Janshakti News

धनगांव येथील हनुमान मंदीरात श्रीराम पूर्तीची उत्सहमय वातावरणात प्राणप्रतिष्ठापना


                                    VIDEO
                                  👇



                        

=====================================
=====================================

भिलवडी वार्ताहर :      दि. २२जानेवारी २०२४

धनगांव ता.पलूस येथील हनुमान मंदीरात प्रभू रामाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना उत्साहमय वातावरणात करण्यात आली.राम,लक्ष्मण,सीतेच्या मूर्तींची व आयोधेहून आलेल्या अक्षदा कलशाची    गावातून टाळ मृदुंगाच्या गजरात,सवाद्य मिरवणूक काढण्यात आली.गावातील सुहासिनीनी ठिकठिकाणी पांचारतीने ओवाळून, पुष्वृष्टी करून स्वागत केले. चंद्रकांत पाठक यांनी सर्व सोहळ्याचे पौराहित्य केले.दत्ता उतळे,सौ.माधुरी उतळे,घनःश्याम साळुंखे,सौ. तनुजा साळुंखे यांच्या हस्ते प्राणप्रतिष्ठापना विधी संपन्न झाला. ह.भ.प.पोपट माने महाराज यांच्या श्रीराम कथा निरुपणाचा कार्यक्रम झाला.दुपारी १२:२२ च्या मुहूर्तावर सियावर रामचंद्र की जय या जयघोषात राममूर्तीवर अक्षदा वाहण्यात आल्या.सरपंच सतपाल साळुंखे,शामराव साळुंखे,हनुमान विकास सोसायटीचे चेअरमन दीपक भोसले,उपसरपंच हणमंत यादव,ग्रामपंचायत सदस्य रमेश पाटील,शैलेश साळुंखे,गणपती यादव,अमोल साळुंखे,शरद जाधव, आनंदा उतळे,अभिजित शेळके,सुधीर साळुंखे,बिपिन साळुंखे,गणेश फिरमे,निलेश जवंजाळे,अजित साळुंखे,प्रदीप साळुंखे,अरविंद साळुंखे,सौरभ साळुंखे,विशाल साळुंखे,संग्राम साळुंखे,प्रथमेश साळुंखे,सौरभ पाटील आदींसह नागरिक बंधू भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.



श्रीराम मूर्ती प्रतिष्ठापना प्रसंगी दत्ता उतळे,घनःश्याम साळुंखे,चंद्रकांत पाठक,पोपट माने,सतपाल साळुंखे आदी.

हेही पहा ----




◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆
◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆
Tags