BANNER

The Janshakti News

मनुवादी व्यवस्था नष्ट करण्यासाठी बहुजनानी एकत्र येणे काळाची गरज ; प्रा. सुकुमार कांबळे
            www.thejanshaktinews.in

====================================
==============================


तासगाव / जुळेवाडी : जुळेवाडी ता. तासगाव जि. सांगली या ठिकाणी बुधवार दि. १० जानेवारी रोजी डेमोक्रेटिक पार्टी ऑफ इंडिया पक्षाच्या शाखेचे उद्घाटन संस्थापक अध्यक्ष प्रा. सुकुमार कांबळे यांच्या हस्ते व पक्षाच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांच्या उपस्थित मोठ्या धुमधडाक्यात पार पडले.

  डि.पी.आय चे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष सतिश लोंढे , राज्य उपाध्यक्ष नंदकुमार नांगरे , युवक राज्य सरचिटणीस विरु फाळके , प.महा.उपाध्यक्ष शेखर मोहिते , सांगली जिल्हा युवक अध्यक्ष आकाश वाघमारे , तासगाव तालुका अध्यक्ष विपुल सुहासे , सांगली जिल्हा नेते संदिप काटे , तासगांव तालुका युवक अध्यक्ष अभय सकटे ,  जिल्हा मार्गदर्शक बजरंग सकटे , नितीन मंडले , दयानंद चव्हाण  (आबा) यांच्या प्रमुख उपस्थितीत नामफलकाचे उद्घाटन करण्यात आले. 
 
 याप्रसंगी बोलताना  प्रा.सुकुमार कांबळे  म्हणाले कि, या देशातील बहुजनांना जाती पोट जातीमध्ये अडकवून बहुजनांच्या मतावर या देशातील व राज्यातील सता घेऊन बहुजनांच्यावरच आज देखील अन्याय अत्याचार करण्याचे काम ही जातीयवादी राजकारणी करीत आहेत. या देशामध्ये हिंदुत्ववाद पेरण्याचे काम ही व्यावस्था करीत आहे. ब्राम्हण्यवादी लोकांनी बहुजनांच्यामध्ये जाती जातीच्या उतरंडी निर्माण करुन हिंदुत्वाचे विष पेरुन समाजा समाजामध्ये भाऊबंदकीमध्ये तेड निर्माण करुन वाद निर्माण केला आहे. या देशामधील मनुवादी विचारसरणीचे लोक भारताचे संविधान मोडीत काढून मनुस्मृती आमलात आणण्याचा प्रयत्न करीत आहेत. 
  आज शिक्षणाचे बाजारीकरण करुन शिक्षणाचे सुध्दा खाजगीकरण करण्यात येत आहे. नोकऱ्यामध्ये खाजगीकरण आणून नोकऱ्या संपविण्यात आलेल्या आहेत.
   सर्व उद्योग व्यवसाय मोडीत काढून ठेकेदारी आणली आहे.असे एक ना अनेक कायदे करुन सर्वसामान्य गोरगरिबांचे कंबरडे मोडले आहे .
   या सर्व गोष्टींचा विचार बहुजनांनी करुन येणाऱ्या 2024 च्या निवडणूकीत या देशातील जातीयवादी बी जे पी सरकारला खाली खेचून फुले शाहू आंबेडकर आण्णा भाऊ साठे यांच्या विचारांनी काम करणाऱ्या बहुजनांचा विकास करणाऱ्या समविचारी लोकांना सत्तेत बसवून या देशातील मनुवादी विचाराने काम करणाऱ्या सरकारला नेस्तानाबूत करुन बहुजनांची सत्ता आणून या देशातील मनुवादी सरकारला खाली खेचण्याशिवाय पर्याय रहाणार नाही.
    यावेळी सतिश लोंढे , नंदकुमार नांगरे विरु फाळके , आकाश वाघमारे , यानीही आपले मनोगत व्यक्त केले.


     शाखेच्या उद्घाटन कार्यक्रमाचे नेटके नियोजन केल्याबद्दल बजरंग सकटे व युवक अध्यक्ष अभय सकटे यांचा सत्कार प्रा. सुकुमार कांबळे यांच्या हस्ते करण्यात आला तर जुळेवाडी शाखेतील सर्वच पदाधिकारी यांचाही सत्कार यावेळी मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. 
  कार्यक्रमाचे प्रास्ताविक जुळेवाडीचे विद्यमान सरपंच तथा डि. पी. आय. चे जिल्हाउपाध्यक्ष नितीन आवळे यांनी केले व आभार अभय सकटे यांनी मानले.

हेही पहा --
◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆
◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆
Tags